News & View

ताज्या घडामोडी

विधानसभा निवडणूक लढवणारच – अनिल जगताप !

सुषमा अंधारेमुळे उबाठा सेनेची अंधार सेना झाली !

दहा जिल्ह्यात लवकरच उबाठा सेनेला धक्के बसणार !

बीड- गेल्या चाळीस वर्षांपासून निष्ठेने काम केल्यावर जर आपल्यावर अन्याय होत असेल तर किती दिवस त्रास सहन करायचा.काहीही झालं तरी आपण येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहोत अस सांगत अनिप जगताप यांनी उबाठा सेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली.त्यांनी आणि संपर्कप्रमुख पोद्दार यांनी पैसे घेऊन पदे वाटल्याचा आरोप त्यांनी केला.दहा जिल्ह्यात लवकरच उबाठा सेनेला धक्का बसेल असेही ते म्हणाले.

शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी उबाठा सेनेला जय महाराष्ट्र केला.त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत अनेक गंभीर मुद्दे मांडले.त्यांनी थेट उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर पैसे घेऊन पदे वाटल्याचा आरोप केला.

आपण प्रामाणिकपणे काम केले,निष्ठा दाखवली,शिवसेना जेव्हा फुटली तेव्हा आपण खंबीरपणे उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहिलो.पण शंभर दिवसांपूर्वी आलेले लोक वरचढ झाले.आपण चाळीस वर्षे काम केलं पण त्यांनीच आपल्यावर आरोप केले.

नव्या पदाधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे गोळा केले गेले,ते मातोश्रीवर पोहचले की नाही हे त्यांनाच माहीत.कोणत्याही अटी शर्थी शिवाय आपला प्रवेशहोणार आहे.प्राथमिक चर्चा झाली आहे.पक्ष देईल ती जबाबदारी आपण पार पाडू .येणारी विधानसभा निवडणूक आपण लढवणार होतो आणि आजही त्यावर ठाम आहोत.

प्रत्येकवेळी विधानसभा निवडणूक लागली की आपल्यावर अन्याय केला जातो,आता आपलं वय 53 आहे,अजून किती वर्षे वाट पाहणार.आपल्या प्रमाणेच दहा जिल्ह्यात अशाच पद्धतीने अन्याय केला गेला आहे.लवकरच ते लोक सुद्धा उबाठा सेनेला सोडतील असेही जगताप यांनी सांगितले.

सुषमा अंधारे यांच्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडली,लोक,पदाधिकारी सोडून गेले तरीही पक्षप्रमुख त्यांचंच ऐकतात याचे आपल्याला आश्चर्य वाटते असेही जगताप म्हणले.।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *