News & View

ताज्या घडामोडी

नगर पालिकेत दररोज दिल्या जातात बोगस पावत्या !

अमोल शिंदे आणि सहकारी रोज कमावतात किमान दोन लाख रुपये !

बीड- बीड नगर पालिकेत नागरिकांकडून भरल्या जाणाऱ्या विविध कराच्या रकमेत मोठ्या प्रमाणावर गडबड घोटाळा केला जात असल्याचे उघडकीस आले आहे. वसुली विभागातील अमोल शिंदे आणि त्याच्या काही साथीदारांनी बोगस पावत्या आधारे किमान एक ते दोन कोटींचा अपहार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.विशेष म्हणजे हे सगळं माहीत असूनही मुख्याधिकारी नीता अंधारे यांचा त्याच्यासारख्या भ्रष्ट कर्मचाऱ्यांना अर्थपूर्ण पाठिंबा आहे.

बीड नगरपालिकेच्या हद्दीत राहणाऱ्या नागरिकांकडून बांधकाम परवाना ,गुंठेवारी, गावठाण ,नामांतर, शैक्षणिक कर ,वृक्ष कर ,घरपट्टी, नळपट्टी असे अनेक कर वसूल केले जातात महिन्यासाठी कोट्यावधी रुपयांची वसुली नगरपालिके मार्फत केली जाते मात्र तरीदेखील नगरपालिका नागरिकांना सुविधा देण्यास असमर्थता दाखवते हे विशेष

सलीम ट्रेसर ने विकली हिंदू स्मशानभूमीची जागा ! उद्याच्या भागात !

बीड नगरपालिकेचा वसुली विभाग ज्या लोकांच्या हातात आहे ते मुख्याधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांपेक्षाही अधिक पैसे कमावतात अशा तक्रारी वारंवार केल्या जातात याबाबत न्यूज अँड न्यूज ने माहिती घेतली असता धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

अशा प्रकारे बोगस पावत्या देऊन दररोज किमान पन्नास हजार ते दोन लाख रुपये घरी नेण्याचे काम अमोल शिंदे आणि त्याचे सहकारी करतात.

बीड नगरपालिकेत नोकरी करणारा अमोल शिंदे नावाचा एक कर्मचारी या वसुली विभागात गेल्या अनेक वर्षापासून कार्यरत आहे त्याच्याकडे वेगवेगळ्या करापोटी पैसे जमा करून घेण्याची जबाबदारी आहे आणि जमा झालेले हे पैसे बँकेत वर्ग करणे हे देखील त्याची जबाबदारी आहे या संधीचा गैरफायदा घेत शिंदे याने दररोज किमान पाच ते दहा पावत्या गायब करायच्या नागरिकांच्या पावत्यांची नोंद संगणकावर करायचीच नाही आणि हे पैसे बँकेत न भरता स्वतःच्या खिशात आणि इतर कर्मचाऱ्यांच्या खिशात घालायचे असा धंदा सुरू आहे.

अमोल शिंदे हा एकटाच हे सगळे धंदे करतो अस नाही तर त्याला अनेक जण सहकार्य करतात.विशेष म्हणजे बोगस पावत्या अन पैशांच्या अफरातफरी बाबत मुख्याधिकारी अंधारे यांना सगळी माहिती आहे.तरीदेखील कुठलीच कारवाई झालेली नाही.

बीड नगर पालिकेत दररोज किमान पन्नास हजार ते दोन लाख रुपयांच्या बोगस पावत्या देऊन गैरकारभार केला जातो अन अधिकारी मात्र हा सगळा प्रकार उघड्या डोळ्यांनी पहात बसतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *