गेवराई- गेवराई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत विद्यमान भाजप आमदार लक्ष्मण पवार आणि शिवसेनेचे माजी मंत्री बदामराव पंडित यांनी राष्ट्रवादीचे माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या विरोधात एकत्र येत पॅनल उभा केला होता मात्र मतदारांनी या दोन्ही आजी-माजी आमदारांचे डिपॉझिट गुल करत पुन्हा एकदा बाजार समितीवर अमरसिंह पंडित यांची सत्ता कायम ठेवली आहे त्यामुळे गेवराई ओन्ली भैय्या अशी चर्चा सुरू झाली आहे
गेवराई बाजार समितीमध्ये यावेळी परिवर्तन करायचेच असा निर्धार करून विधानसभेला एकमेकांच्या विरोधात उभे राहिलेले माजी मंत्री बदामराव पंडित आणि विद्यमान भाजप आमदार लक्ष्मण पवार यांनी एकत्र येत राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात पॅनल उभा केला होता
निवडणूक प्रचारात हे दोन्ही आजी माजी आमदार वेगवेगळे फिरत असल्याचे चित्र होते दुसरीकडे राष्ट्रवादीचे माजी आमदार अमरसिंह पंडित जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित त्यांचे बंधू जयसिंह पंडित या तिन्ही भावांनी नियोजनबद्ध पद्धतीने मतदारांपर्यंत पोहोचत केलेला प्रचार अखेर कामी आला आहे
बाजार समितीच्या 18 पैकी 18 जागांवर अमरसिंह पंडित यांचे उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत दुसरीकडे पंडित पवार या दोन्ही आजी-माजींच्या उमेदवारांचे डिपॉझिट मतदारांनी गुल केले आहे या विजयानंतर गेवराई मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केल्याचे चित्र पाहायला मिळाले
Leave a Reply