News & View

ताज्या घडामोडी

उशिरा का होईना पाटलांना एसपी नी जागा दाखवली !

बीड- गुटखा असो की मटका अथवा कोणतेही अवैध धंदे त्याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष करण्यासाठी नावाजलेले बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांना तडकाफडकी कंट्रोल रुमला अटॅच करण्यात आले आहे.रिक्षाचालकाकडून लाच घेण्याचा प्रकार ठाणे प्रमुख म्हणून पाटील यांना भोवला आहे.पाटील यांच्यावर उशिरा का होईना कारवाई करत एसपी ठाकूर यांनी त्यांना जागा दाखवल्याची चर्चा होत आहे.

बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रिक्षा चालकाकडून 600 रुपयांची लाच घेण्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला होता.यामध्ये ग्रामीण ठाण्यातील कर्मचारी आणि खाजगी इसम यांना लाच घेताना पकडले होते.एसपी ठाकूर यांनी अनिल घटमळ या कर्मचाऱ्यांचे निलंबन केले.

ठाण्याचे प्रमुख म्हणून विश्वास पाटील यांना जबाबदार धरून एसपी ठाकूर यांनी त्यांना तडकाफडकी कंट्रोल रूम ला हलवले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून पाटील हे बीड ग्रामीण येथे जॉईन झाल्यापासून अवैध धंदे करणाऱ्यांना अच्छे दिन आले होते.अतिरिक्त पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने गुटखा,मटका आणि वाळूच्या अनेक कारवाई ग्रामीण च्या हद्दीत केल्या.

पाटील यांच्या काळात अवैध धंदे करणाऱ्यांवर कुठलीच कारवाई झालेली नव्हती.त्यामुळे त्यांना कंट्रोल ला हलवून कारवाई करण्यास जरा उशीरच झाला अशी प्रतिक्रिया लोकांत व्यक्त केली जात आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *