बीड- शहरातील एका प्रथितयश संस्थेतील एका शिक्षकाने स्वतःच्याच पत्नीसोबत शारीरिक संबंध करतानाचे व्हिडीओ रेकॉर्ड केले.हे प्रकरण पोलिसांपर्यंत गेले,गुन्हा दाखल झाला मात्र सदरील शिक्षकाने अशाच पद्धतीने इतर महिलांचे देखील व्हिडीओ तयार केले आहेत.तरीही या प्रकरणात त्याला संस्थाचालक पाठीशी घालत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
बीड शहरातील एका नामांकित संस्थेत नोकरीस असलेल्या शिक्षकाने आपल्या पत्नीसोबत शारीरिक संबंध करतानाचे अनेक व्हिडीओ रेकॉर्ड केले.हा सगळा प्रकार अनेक महिन्यापासून सुरू होता.
मात्र याबाबत त्याच्या पत्नीला कसलीही कल्पना नव्हती.त्याने यासोबत इतरही अनेक महिला सोबत संबंध ठेवतानाचे व्हिडीओ रेकॉर्ड केले होते.महिना दीड महिन्यांपूर्वी हा शिक्षक बाहेरगावी गेलेला असताना त्याचे हे व्हिडीओ पत्नीच्या हाती लागले.
- पवारांची उद्या बीडला सभा !
- प्रवक्त्याने ढापले तेरा लाख !
- आजचे राशिभविष्य !
- आजचे राशिभविष्य !
- आजचे राशिभविष्य !
तिने हे व्हिडीओ आपल्या वडिलांना दाखवले. त्यानंतर या शिक्षकाने सासरच्या लोकांवर ब्लॅकमेलिंग चा गुन्हा दाखल केला.हे सगळे प्रकरण संस्थाचालक यांच्यापर्यंत गेले.मात्र त्यांनी यावर कोनतीही कारवाई केली नाही.
या शिक्षकाने संस्थेतील इतर अनेक शिक्षिका आणि विफ्यार्थिनींचे लैंगिक शोषण केल्याची चर्चा आहे.मात्र संस्था चालकांनी तोंडावर बोट ठेवल्याने त्यांच्याबद्दल वेगळीच चर्चा सुरू झाली आहे.
Leave a Reply Cancel reply