News & View

ताज्या घडामोडी

नोकरी जिल्हा परिषदेत कारभार स्वतःच्या संस्थेत बसून ! विस्तार अधिकारी शेळकेंना कुणाचे पाठबळ !!

बीड- बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात पाटोदा येथे शिक्षण विस्ताराधिकारी असलेले ऋषिकेश शेळके यांची मूळ पोस्टिंग पाटोद्याला असताना त्यांची प्रतिनियुक्ती समग्र शिक्षा अभियान बीड कार्यालयात करण्यात आलेली आहे मात्र ते या ठिकाणी नोकरी करण्याऐवजी शिक्षणाधिकारी कुलकर्णी यांच्या मागेपुढे करत आपले उकळ पांढरे करून घेत आहेत सरकारी नोकरी स्वतःच्या संस्थेत बसून करणाऱ्या या अधिकाऱ्याला जिल्हा परिषद प्रशासन का पाठीशी घालते अशी चर्चा आता होऊ लागली आहे

बीड जिल्हा परिषदेमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सूत्र हाती घेतल्यानंतर अविनाश पाठक यांनी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे जिल्हा परिषदेच्या कारभारात देखील गती आली आहे मात्र जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात काही अधिकारी हे पाठक यांच्या आदेशाला हरताळ फासत आहेत असे चित्र आहे

बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील शिक्षण विस्तार अधिकारी ऋषिकेश शेळके यांची मूळ पद स्थापना पाटोदा येथे आहे मात्र ते त्या ठिकाणी कधीच हजर नसतात त्यांनी काही महिन्यांपूर्वी बीडच्या समग्र शिक्षा अभियान कार्यालयात प्रतिनियुक्ती करवून घेतली त्यानंतर ते या कार्यालयात बसून काम करतील ही अपेक्षा देखील फोल ठरली आहे ते शिक्षणाधिकारी कुलकर्णी यांच्या मागेपुढे करत त्यांच्यासोबत हिंडून इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तसेच संस्थाचालकांना त्रास देण्याचा उद्योग करत आहेत विशेष बाब म्हणजे या शेळके महाशयांच्या स्वतःच्या खाजगी संस्थेत बसून हे जिल्हा परिषदेचा जमेल तसा कारभार हातात आणि त्यातूनही आपल्या पदरात काय पडेल याचाच विचार करतात या शेळके महाशयांवर पाठक यांच्याकडून काही कारवाई होणार का की शेळके पाठक यांना देखील गुंडाळणार अशी चर्चा होत आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *