बीड- जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील कर्मचारी राजेंद्र नवगिरे याने शिरूर आणि खालापुरी येथे नोकरीस असलेल्या कर्मचाऱ्यांचे भविष्य निर्वाह निधी आणि इन्कम टॅक्स च्या पैशांचा अपहार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.आरोग्य अधिकाऱ्यांच्या खात्यातून ही रक्कम नवगिरे याने आपल्या खात्यात वळवून लाखो रुपये हडप केले.तब्बल वर्षभर हा कारभार सुरू होता हे विशेष.
शिरूर कासार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कनिष्ठ सहायक असलेल्या राजेंद्र नवगिरे याने शिरूर आणि खालापुरी येथील आरोग्य केंद्रात जे कर्मचारी नोकरीस आहेत त्यांच्या पैशाचा अपहार केला आहे.
गेल्या वर्षभरपेक्षा अधिक काळापासून नवगिरे हे शिरूर आणि खालापुरी येथील वैद्यकीय अधिकारी यांच्या अकाउंट वर जमा झालेले पैसे आपल्या खात्यावर वळवत होते. जवळपास पंधरा लाखापेक्षा अधिक रक्कम त्याने आपल्या खात्यावर जमा करून घेतली.
हा सगळा प्रकार तेव्हा उघडकीस आला जेव्हा येथील कर्मचाऱ्यांना इन्कम टॅक्स भरला नसल्याच्या नोटीस प्राप्त झाल्या. त्यानंतर चौकशी केली असता कर्मचाऱ्यांच्या पगारातून हे पैसे कपात झाले मात्र इन्कम टॅक्स किंवा भविष्य निर्वाह निधी मध्ये जमा झाले नसल्याचे लक्षात आले.
- नागपूर घोटाळ्यानंतर शिक्षण विभागाला खडबडून जाग!
- आजचे राशीभविष्य!
- कासलेची फेकाफेकी उघड!निवडणूक विभागाकडून गुन्हा दाखल!
- पोलीस पाटलांची भरती सुरु!
- आजचे राशीभविष्य!
राजेंद्र नवगिरे याने यापूर्वी देखील अशाच प्रकारे अपहार केल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.आता पुन्हा तोच प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.
Leave a Reply