News & View

ताज्या घडामोडी

बीड जिल्हा शांत !

बीड- मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी सुरू असलेल्या शांततामय आंदोलनाला सोमवारी बीड जिल्ह्यात हिंसक वळण लागले.रात्री जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी संचारबंदी लागू केली.त्यानंतर रात्रीतून ऍक्शन मोडमध्ये आलेल्या पोलिसांनी 30 ते 40 जणांना अटक केली आहे.सध्या बीड जिल्हा शांत आहे.जिल्हा आणि पोलीस प्रशासनाने शांततेचे आवाहन केले आहे.

बीड जिल्ह्यात माजलगाव,वडवणी आणि बीडमध्ये अनेक ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्या.राजकीय नेते ,त्यांची घर आणि कार्यलय आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.शासकीय कार्यालये,गाड्या देखील जाळण्यात आल्या.

रात्री स्वतः जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे या रस्त्यावर उतरल्या. त्यानंतर त्यांनी हाताबाहेर गेलेली परिस्थिती लक्षात घेत संचारबंदी लागू केली.

जिल्ह्यात संचारबंदी लागू झाल्यानंतर पोलिसांनी रात्री सगळीकडे चोख बंदोबस्त लावला.रात्रीतून30 ते 40 जणांना अटक केली.बीड शहरातील चौका चौकात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सध्या बीड जिल्हा शांत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *