News & View

ताज्या घडामोडी

बीडमध्ये संचारबंदी !

बीड- मराठा आरक्षणाच्या विषयावरून सुरू असलेले आंदोलनाला बीडमध्ये हिंसक वळण लागले माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आमदार संदीप क्षीरसागर यांच्या बंगल्यासह राजकीय पक्षांची कार्यालय देखील पेटवण्यात आली मोठ्या प्रमाणात दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्यामुळे स्वतः जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे रस्त्यावर उतरल्या त्यांनी बीडमध्ये संचारबंदी लागू केली आहे

आरक्षणाच्या प्रश्नावरून सुरू असलेल्या आंदोलनाला बीड जिल्ह्यामध्ये सोमवारी सकाळपासून हिंसक वळण लागले माजलगाव चे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळुंके यांचे घर शाळा कॉलेज नगरपरिषद कार्यालय येथे प्रचंड तोडफोड करत आग लावण्यात आली त्यानंतर दुपारी तीन वाजेपासून आंदोलकांनी बीड शहरात प्रचंड दगडफेक आणि जाळपोळीचे प्रकार केले नगर रोड जालना रोड बार्शी रोड या प्रमुख रस्त्यावर टायर जाळून जाळून रस्ते बंद करण्यात आले

नगरपरिषद असो की राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्यालय अथवा कुंडलिक खांडे यांचे शिवसेनेचे कार्यालय तसेच राजेंद्र मस्के यांचे भाजपचे कार्यालय या आंदोलकांनी तोडफोड करत जाळले माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे नवगण कॉलेज परिसरात असलेले कार्यालय देखील पेटवून देण्यात आले त्यानंतर आंदोलकांनी शिरसागारांच्या बंगल्याला आग लावली

या सर्व घटना घडामोडीनंतर स्वतः जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे या रस्त्यावर उतरल्या जिल्हाधिकारी मुंडे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर जिल्हा परिषदेचे सीईओ अविनाश पाठक यांनी रस्त्यावर उतरत परिस्थितीची पाहणी केली दरम्यान जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील सर्व तालुका मुख्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालय तसेच राष्ट्रीय महामार्ग या परिसरात कलम 144 2 नुसार संचारबंदी लागू केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *