बीड- जिल्ह्यात शनिवारी दुपारपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे आष्टी,अंबाजोगाई आणि परळी तालुक्यातील आठ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली.धानोरा मंडळात तब्बल 132 मिमी पावसाची नोंद झाली.या पावसामुळे मोठ्या प्रमाणात रस्त्याचे,शेतीचे नुकसान झाले.
आष्टी तालुक्यातील आष्टी मंडळ (68.8 mm), कडा मंडळ (93.5 mm), दौलावडगाव मंडळ (89.8 mm), पिंपळा (72.3 mm) व धानोरा मंडळ (132.5 mm) तसेच अंबेजोगाई तालुक्यातील अंबेजोगाई मंडळ (72.0 mm), लोखंडी सा. (72.0 mm) व बर्दापुर मंडळ येथे (106.3 mm) आणि परळी तालुक्यातील धर्मापुरी मंडळात (69.0) अतिवृष्टी ची नोंद झाली आहे.
बीड जिल्ह्यात जूनपासून पावसाने ओढ दिली होती.नव्वद दिवसात केवळ पंधरा ते वीस दिवस पाऊस झाल्याने दुष्काळाचे सावट गडद झाले होते.मात्र गेल्या तीन चार दिवसापासून पावसाने पुन्हा जोर धरला आहे.शनिवारी दुपारपासून सुरू झालेला पाऊस आष्टी,अंबाजोगाई आणि परळी तालुक्यात धुमाकूळ घालून गेला.
Leave a Reply