News & View

ताज्या घडामोडी

FB IMG 1690035890858

आ संदिप क्षीरसागर यांचे जल्लोषात स्वागत !

बीड- राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी मिळाल्यानंतर बीडचे आ संदिप क्षीरसागर यांचे बीडमध्ये कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले.नवगण राजुरी येथील गणपतीचे दर्शन घेतल्यानंतर आ क्षीरसागर यांनी बीडमध्ये प्रवेश केला.छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांचे अभूतपूर्व स्वागत केले.त्यानंतर बाईक रॅलीने बीड शहरातील वेगवेगळ्या महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यात आले.

fb img 16900358985956153574119923226900

आ.संदीप क्षीरसागर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर शनिवार (दि.२२) रोजी पहिल्यांदाच जिल्ह्यात आले. त्यांनी प्रथमतः आपले स्वतःचे गाव असलेल्या राजुरी (न.) येथे जाऊन ग्रामदैवत श्री मंगलमुर्ती देवस्थान येथे दर्शन घेऊन सर्व नियोजीत कार्यक्रमाची सुरुवात केली. राजुरी तसेच पंचक्रोशीतील गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होत आ.क्षीरसागरांचे क्रेनच्या सहाय्याने भव्य हार घालून स्वागत व सत्कार केला. यावेळी आ.संदीप क्षीरसागर यांनी गावाने वेळोवेळी दिलेला आशिर्वाद आणि साथ याबद्दल सामुहिक रित्या ऋण व्यक्त केले. सर्वांशी संवाद साधून पुन्हा एकदा, पक्षाची मोठी जबाबदारी पार पाडण्यासाठी आपल्या आशिर्वाद आणि साथीची गरज मला आहे, अशी भावना व्यक्त केली. आ.क्षीरसागरांनी आपल्या आईच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन केले व आशिर्वाद घेतले. यानंतर आ.संदीप क्षीरसागर बीड शहरात दाखल होताच फटाके वाजवून, घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी त्यांचे जोरदार स्वागत केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *