News & View

ताज्या घडामोडी

  • दिलेला शब्द मी पाळला- मुख्यमंत्री शिंदे !

    दिलेला शब्द मी पाळला- मुख्यमंत्री शिंदे !

    मुंबई- मी शब्द पाळणारा माणूस आहे,छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेऊन आरक्षण देणारच अस सांगितले होते ते आज पूर्ण झाले.हे सर्वसामान्य माणसाचं सरकार आहे,मतासाठी नाही तर हितासाठी निर्णय घेतले आहेत अस सांगत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षण प्रश्न निकाली निघाल्याची घोषणा केली. आजचा दिवस आनंदाचा,विजयाचा दिवस आहे,गुलाल उधळण्याचा दिवस आहे,मी तुमच्या प्रेमापोटी येथे…

  • जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या साक्षिणे उधळला विजयाचा गुलाल !

    जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या साक्षिणे उधळला विजयाचा गुलाल !

    मुंबई- मराठा समाजाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न सोडवणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सर्व सहकारी मंत्र्यांचे मनापासून आभार मानत मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत विजयाचा गुलाल उधळला.यावेळी शिंदे यांनी जरांगे पाटील यांचे पेढे भरवून अभिनंदन केले. मागील पाच महिन्यापेक्षा अधिक काळापासून सुरू असलेला मनोज जरांगे पाटील यांचा लढा अखेर यशस्वी झाला आहे. सरकारने जरांगे…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .तुमच्याकडे प्रचंड प्रमाणात ऊर्जा आहे – परंतु कामाच्या ताणामुळे तुम्ही त्रासून जाल. आपल्यासाठी पैसा वाचवण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. आज तुम्ही योग्य बचत करण्यात यशस्वी व्हाल. मित्रांच्या योगाने महत्त्वाच्या व्यक्तींशी संपर्क बनतील. तुमच्या नात्यातल्या सगळ्या तक्रारी आज निघून जातील. सहकारी आणि हाताखालील कर्मचारी काळजी आणि तणाव निर्माण करु शकतात. नव्या कल्पनांची परिक्षा घेण्यासाठी…

  • मुंबईतील आंदोलन उद्यापर्यंत सुरूच राहणार – जरांगे पाटील !

    मुंबईतील आंदोलन उद्यापर्यंत सुरूच राहणार – जरांगे पाटील !

    मुंबई- राज्यात 54 लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत,त्यांच्या प्रमाणपत्राचे वाटप सुरू झाले आहे.यामुळे जवळपास दोन कोटी लोकांना याचा लाभ मिळणार आहे.प्रमाणपत्र मिळण्यासाठी आपल्याला अर्ज करावा लागेल.नोंदि सापडण्यासाठी आपण मदत केली पाहिजे.असे सांगत शनिवारी आंदोलन मागे घेण्याबाबत निर्णय घेण्यात येईल अशी माहिती मराठा आंदोलनाचे प्रमुख मनोज जरांगे पाटील यांनी दिली. 54 लाख पैकी 37 लाख लोकांना…

  • शिवसृष्टीला फेरीवाल्यांचा वेढा !राष्ट्रीय सणावाराला साफसफाई सुद्धा नाही !

    शिवसृष्टीला फेरीवाल्यांचा वेढा !राष्ट्रीय सणावाराला साफसफाई सुद्धा नाही !

    मुख्याधिकारी अंधारे यांचे अक्षम्य दुर्लक्ष ! बीड- बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकांत उभारण्यात आलेल्या शिवसृष्टी ला अतिक्रमणाचा आणि फेरीवाल्यांचा वेढा पडला आहे.26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी सुद्धा शिवसृष्टी आणि परिसराची साफसफाई नगर परिषदेने केली नसल्याचे दिसून आले.मुख्याधिकारी नीता अंधारे यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे महापुरुषांच्या स्थळांची दुरावस्था होत आहे. बीड नगर परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष डॉ भारतभूषण…

  • आजचे राशिभविष्य !

    आजचे राशिभविष्य !

    मेष राशी .आनंदाने खुशीने परिपूर्ण असा चांगला दिवस. आज केवळ बसून राहण्यापेक्षा – काहीतरी असे करा ज्यामुळे तुमची मिळकत क्षमता वाढू शकेल. आपल्या उदार वागण्याचा फायदा मुलांना घेऊ देऊ नका. तुमच्या हृदयाला आवाहन करतील अशा एखाद्या व्यक्तीशी बेट होण्याचा जबरदस्त योग आहे. आनंद, समाधान आणि व्यवसाय दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या ठेवा. वेळेचा सदुपयोग करण्यासाठी आज तुम्ही…