News & View

ताज्या घडामोडी

images 2020 07 11T085039.947

आजचे राशीभविष्य!


 सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग 
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४८
🌞 संवत्सर : पराभवनाम
🌕 ॠतु…. शरद
🚩 दक्षिणायन 🌕 कार्तिक शुक्ल तृतीया / संकष्टी चतुर्थी चंद्रोदय ०८/५१मि
🌸 नक्षत्र…. आर्दा
🌸 वार…. शुक्रवार
🌼 दिनांक….. २७ नोव्हेंबर २०२६
🌚 राहुकाल…. स. १०/३० ते १२/००
🌞 आजचा दिवस शुभ
🌞 सुर्योदय ०६/४२ मि.
🌘 सुर्यास्त ०५/३५ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩

🚩 शुभभवंतु 🚩

‼️दैनिक राशी भविष्य‼️

‼️दिनांक २७ नोव्हेंबर २०२६‼️

मेष:- चांगला दिवस आहे कारण तुम्हाला प्रिय व्यक्तीची भेट होईल. कौशल्यपूर्ण कामामध्ये प्रगती साधेल. उत्साह वाढवणाऱ्या घटना घडतील. नियोजनपूर्वक कामासाठी उत्तम दिवस आहे. सकारात्मकता वाढवा.

वृषभ:- मन प्रसन्न राहील आनंदी राहाल. आर्थिक वाढ होईल आणि त्याचे योग्य नियोजन कराल. अचानक लाभ होतील. मित्रांकडून काही शुभ समाचार समजतील. चांगले संबंध प्रस्थापित होतील.

मिथुन:- उत्साहवर्धक दिवस आहे. विनयाने विजय प्राप्त कराल ज्ञान आणि धर्म यांची जोड घातली जाईल. अनुकूल दिवस आहे. प्रिय व्यक्ती भेटतील. उत्साह वाढेल. भेटवस्तू मिळतील. धनधान्य वाढेल.

कर्क:- स्वप्ने साकार होतील. भेटीगाठी व वरिष्ठांचे आशिर्वाद प्राप्त कराल. संमिश्र ग्रहमान आहे. आज तुमची परीक्षा होणार आहे. शुभ कार्यासाठी खर्च कराल. नात्यात गैरसमज होऊ शकतात. भलत्या ठिकाणी धाडस करू नका.

सिंह:- चंद्र लाभस्थानात आहे. आज सुखद अनुभव येतील. नोकरी- व्यवसायात यश मिळेल. समृद्धी अनुभवायला मिळेल. महत्वाकांक्षा पूर्ण होतील. शब्द देताना काळजी घ्या. संयमाने वागा.

कन्या:- विचारपूर्वक कार्य संपादन करा. आर्थिक लाभ होतील. तरुणांना आज नोकरीच्या चांगल्या संधी प्राप्त होतील. न्यायप्रियता दिसून येईल. प्रसिद्धी मिळेल. क्रोध करू नका.

तुळ:- आत्मविश्वास व उत्साह वाढेल. आनंदी घटना घडतील. अचानक लाभ होतील. भाग्योदय होईल. तीर्थाटन घडेल. ज्ञानाचा योग्य उपयोग होईल. जमीन व्यवहारात मात्र अपेक्षित यश मिळणार नाही.

वृश्चिक:- मनाची चंचलता वाढेल निर्णय क्षमता कमी होईल. अष्टम स्थानी चंद्र आहे. शत्रू पराभूत होतील. अध्यात्मिक ज्ञान प्रपात होईल. गूढ बाबीची आवड निर्माण होईल. वारसा हक्काने संपत्ती मिळेल.

धनु:- योग्य नियोजनातून आर्थिक लाभ होतील. येणी वसूल होतील. संपत्ती वाढेल. वैवाहिक जीवनात समाधान लाभेल. शुभ समाचार समजतील. काही जुने वाद मिटतील. विश्वासू मित्राची भेट होईल.

मकर:- समाधानकारक घटना घडतील. आनंदी राहाल, तुम्हाला सदाचाराने वागणे आवडते. आज त्यासाठी उत्तम ग्रहमान आहे. व्यावसायिक लाभ होतील. धन संपत्ती वाढेल. आरोग्य सुधारेल. शत्रूवर विजय प्राप्त होईल. वरिष्ठ काहीसे नाराज होऊ शकतात.

कुंभ:- चांगला दिवस आहे. नातेवाईक मित्र भेटीगाठीतून कार्य होईल. शिक्षणात चांगले यश मिळेल. वाहन सुख लाभेल. प्रवास घडतील. रचनात्मक कार्य होईल. भाग्य चमकेल.

मीन:- अनुकूल ग्रहमान आहे. सुख, समृद्धी अनुभवास येईल. जमीन संबंधित कामे पूर्ण होतील. वेळ दवडू नका. हाती घ्याल ते कार्य तडीस न्याल. इतरांना मदत कराल. वाहन सौख्य लाभेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *