मुंबई- गेल्या दहा ते बारा दिवसापासून रखडलेलं राज्य सरकारचे खातेवाटप जाहीर झाला असून अपेक्षेप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ आणि नियोजन तर बीडचे धनंजय मुंडे यांच्याकडे कृषी मंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली आहे त्यामुळे आता अब्दुल सत्तार हे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
राज्य मंत्रिमंडळात 5 जुलै रोजी सामील झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासहित नव मंत्र्यांचा खातेवाटप कार्यक्रम रखडला होता दहा ते बारा दिवस झाल्यानंतरही खातेवाटप होत नसल्याने अस्वस्थता होती दरम्यान मुख्यमंत्र्यांनी खातेवाटप जाहीर केले असून अजित पवार यांच्याकडे वित्त व नियोजन दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सहकार छगन भुजबळ यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा धनंजय मुंडे यांच्याकडे कृषी धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडे अन्न व औषध प्रशासन संजय बनसोडे यांच्याकडे क्रीडा हसनमुश्री यांच्याकडे वैद्यकीय शिक्षण आदिती तटकरे यांच्याकडे महिला व बालविकास आणि अनिल पाटील यांच्याकडे मदत व पुनर्वसन मंत्रालयाची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे
Leave a Reply