बुधवारी मंत्रिमंडळ विस्तार अन फेरबदल !!
मुंबई- राज्य मंत्रिमंडळात दहा दिवसांपूर्वी अजित पवार अँड कंपनीचा समावेश झाल्यानंतर फेरबदल आणि विस्ताराची चर्चा सुरू झाली.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी 12 जुलै रोजी राजभवनात विस्तार होणार आहे.यामध्ये भाजपच्या पाच प्रमुख मंत्र्यांना वगळण्यात येणार असून शिवसेनेचे देखील चार मंत्री घरी बसवण्यात येणार आहेत.भाजपकडून चंद्रकांत पाटील यांच्या सहित दिग्गजांना बदलण्यात येणार आहे.
राज्यात वर्षभरापूर्वी सत्तेवर आलेल्या शिवसेना भाजप युती सरकारला 5 जुलै रोजी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस ने पाठिंबा दिला.अजित पवार यांच्यासह नऊ जणांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.
मात्र गेल्या दहा दिवसांत खाते वाटप झालेले नाही.तसेच पाठीमागून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना मंत्री केले मात्र आमच्यावर अन्याय झाला अशी चर्चा सेना भाजपच्या आमदारांमध्ये सुरू झाली होती.
अजित पवार गटाने वित्त,ग्रामविकास,महिला बालकल्याण,ऊर्जा,गृहनिर्माण, जलसंपदा,शालेय शिक्षण अशी तगडी खाती मागितल्याने गेल्या दहा दिवसापासून ओढाताण सुरू आहे.सोमवारी रात्री बारा ते दीड दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक झाली.
त्यानंतर मंगळवारी देखील बैठकांचा सिलसिला सुरूच होता.दरम्यान भाजपकडून विद्यमान मंत्रिमंडळातील चंद्रकांत पाटील, विजयकुमार गावित, सुरेश खाडे, मंगलप्रभात लोढा यांच्यासह अतुल सावे यापच मंत्र्यांना नारळ देण्यात येणार असून संजय कुटे, आशिष शेलार यांच्यासह नऊ जणांचा नव्याने समावेश होईल.दुसरीकडे शिवसेनेत मंत्रिपद सोडण्यावरून बरीच चर्चा सुरू आहे.परंतु अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे,तानाजी सावंत यांच्यासह चार जणांना वगळले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
बुधवारी दुपारी राजभवन मध्ये नवीन मंत्र्यांचा शपथविधी होईल आणि रात्रीपर्यंत खाते वाटप होईल अशी माहिती आहे.
Leave a Reply