सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४८
🌞 संवत्सर : पराभवनाम
🌕 ॠतु…. ग्रीष्म
🚩 उत्तरायण 🌕 वैशाख कृष्ण त्रयोदशी / चतुर्दशी
🌸 नक्षत्र…. अश्विनी
🌸 वार…. शुक्रवार
🌼 दिनांक….. १५ मे २०२६
🌚 राहुकाल…. सकाळी १०/३० ते १२/००
🌞 आजचा दिवस उत्तम
🌞 सुर्योदय ०५/४५ मि.
🌘 सुर्यास्त ०६/५५ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩
🚩 शुभभवंतु 🚩
‼️ दैनिक राशी भविष्य‼️
‼️ दिनांक १५ मे २०२६‼️
मेष
आज सामूहिक कामात,तसेच सोशल मीडिया मार्फत लाभ घडेल.
ओळखींतून फायदा मिळेल. संध्याकाळनंतर मन थोडे भावुक होऊ शकते.प्रेमसंबंधात यश.
वृषभ
आज
करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळेल. कुटुंबातील सदस्याचे सहकार्य लाभेल. कामातील कल्पकता आणि आत्मविश्वासामुळे यश मिळेल.
मिथुन
आज
प्रवास, शिक्षण किंवा नवीन गोष्टी शिकण्यासाठी दिवस अनुकूल आहे. संवादातून चांगल्या संधी मिळू शकतात.
कर्क
आज
आर्थिक विषयांमध्ये सुधारणा दिसेल. गुंतवणूक किंवा बचतीबाबत योग्य निर्णय घेऊ शकाल. अंतर्मनाचा कौल लाभदायक ठरेल.
सिंह
आज
नातेसंबंधात आनंद आणि जवळीक वाढेल.भेटीगाठी होतील. जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. भागीदारीत लाभ होऊ शकतो.पाहुण्यांचे आदरातिथ्य करावे लागेल.
कन्या
आज
कामात गती आणि शिस्त राहील. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल.रेंगाळलेली कामे मार्गी लागतील.छोटे आर्थिक लाभ घडतील. आरोग्याकडे थोडे लक्ष देणे आवश्यक आहे.खाण्याची पथ्ये पाळा.
तुळ
आज
आजचा दिवस प्रेम, सर्जनशीलता आणि आनंदासाठी उत्तम आहे. विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी अभ्यासात सकारात्मक प्रगती दिसेल.
वृश्चिक
आज
घरातील वातावरण शांत आणि आनंदी राहील. कुटुंबातील एखादी शुभ बातमी मन प्रसन्न करेल.घरातील इंटेरिअर वर खर्च कराल.
धनु
आज
बोलण्यातून लाभ मिळेल. छोट्या प्रवासाची शक्यता आहे. नवीन ओळखी भविष्यात उपयोगी पडतील.
मकर
आज
आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता आहे. नवीन उत्पन्नाचे मार्ग मिळू शकतात. खर्चावर नियंत्रण ठेवा.छोटे प्रवास होतील.
कुंभ
आज उत्तम दिवस.
सकाळपासून संध्याकाळपर्यंत आत्मविश्वास आणि ऊर्जा उत्तम राहील. व्यक्तिमत्त्व प्रभावी दिसेल. संध्याकाळनंतर संवादातून लाभ होईल.सौख्य लाभेल.सुरूची भोजनाचा आस्वाद घ्याल.
मीन
आज
संध्याकाळनंतर चंद्र तुमच्या राशीत आल्यामुळे मन अधिक शांत आणि भावुक होईल. आध्यात्मिक गोष्टींकडे ओढ वाढू शकते.





Leave a Reply Cancel reply