केज- तालुक्यातील उमरी शिवारात असलेल्या एका कला केंद्रावर पोलिसांनी छापा घातला.याठिकाणी काही अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण होत असल्याचे उघड झाले आहे.पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हे कलाकेंद्र शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाचे असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
केज तालुक्यातील उमरी ग्रामस्थांनी या ठिकाणी सुरू असलेल्या कलाकेंद्राबाबत पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली होती.त्यानंतर सपोनि सुरेखा धस यांच्या पथकाने या ठिकाणी छापा घातला.
यावेळी डीजेच्या तालावर रात्री दोन वाजता काही महिला,मुली नाचत असल्याचे आढळून आले.या ठिकाणी दारू,गुटखा,कंडोम देखील आढळून आले.पोलिसांनी येथील महिला,मुलींचा जबाब घेतला असता त्यामध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचे त्यांनी सांगितले.
सदरील कला केंद्र हे शिवसेनेच्या जिल्हाप्रमुख याचे असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले आहे.सदरील जिल्हाप्रमुख कोणत्या गटाचा आहे हे मात्र समजू शकलेले नाही.
Leave a Reply