News & View

ताज्या घडामोडी

images 2020 07 11T085039.947

आजचे राशीभविष्य!


 सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग 
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४८
🌞 संवत्सर : पराभवनाम
🌕 ॠतु…. ग्रीष्म
🚩 उत्तरायण 🌕 वैशाख कृष्ण द्वादशी ( धर्मवीर संभाजी महाराज जयंती (तारखेप्रमाणे )
🌸 नक्षत्र…. रेवती
🌸 वार…. गुरुवार
🌼 दिनांक….. १४ मे २०२६
🌚 राहुकाल…. दुपारी ०१/३० ते ०३/००
🌞 आजचा दिवस चांगला
🌞 सुर्योदय ०५/४५ मि.
🌘 सुर्यास्त ०६/५५ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩

🚩 शुभभवंतु 🚩

‼️ दैनिक राशी भविष्य‼️
‼️ दिनांक १४ मे २०२६‼️

मेष
आज
मैत्र आणि ओळखींतून लाभ मिळेल. नवीन योजना सुरू करण्यासाठी चांगला दिवस आहे. आर्थिक लाभाची शक्यता आहे.सरकारी कामात यश.नवीन संधी चालून येतील.

वृषभ
आज
करिअरमध्ये प्रगतीची चिन्हे दिसतील. वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकते. जबाबदाऱ्या आत्मविश्वासाने पार पाडाल.पदोन्नती ची शक्यता.

मिथुन
आज
नशिबाची साथ मिळेल. शिक्षण, प्रवास किंवा नवीन कौशल्य शिकण्यासाठी उत्तम वेळ आहे. मन सकारात्मक राहील.सरकार कडून लाभ होतील. बढती मिळेल.

कर्क
आज
आर्थिक व्यवहारात चांगले निर्णय घेऊ शकाल. गुंतवणुकीबाबत विचार करू शकता. अंतर्मन योग्य दिशा दाखवेल.

सिंह
आज
नातेसंबंधात सुधारणा दिसेल. जोडीदारासोबत आनंददायी वेळ घालवाल. भागीदारीत लाभ होण्याची शक्यता आहे.

कन्या
आज
कामाचा व्याप वाढेल पण मेहनतीचे चांगले फळ मिळेल. आरोग्याकडे लक्ष द्या आणि दिनचर्या संतुलित ठेवा.उष्णतेचे त्रास होऊ शकतात.

तुळ
आजचा दिवस आनंद, सर्जनशीलता आणि प्रेमासाठी अनुकूल आहे. विद्यार्थिनींना अभ्यासात चांगली प्रगती दिसेल.समस्येवर मार्ग सापडतील.

वृश्चिक
आज
घरातील वातावरण आनंदी राहील. कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. घराशी संबंधित शुभ निर्णय होऊ शकतात.

धनु
आज
संवाद कौशल्यामुळे कामात यश मिळेल. छोट्या प्रवासाची शक्यता आहे. नवीन संपर्क फायदेशीर ठरतील.शत्रूंवर विजय मिळेल.पतीकडून सन्मान प्राप्ती चे योग. कौतुक होईल.

मकर
आज
आर्थिक लाभाची शक्यता आहे.मन द्विधा राहील. खर्च आणि बचत यामध्ये संतुलन ठेवणे आवश्यक आहे. आत्मविश्वास वाढेल.

कुंभ
आज
चंद्र तुमच्या राशीत असल्याने व्यक्तिमत्त्व प्रभावी राहील.मानसन्मान मिळेल.संतती कडून शुभ समाचार मिळू शकतो. नवीन सुरुवात करण्यासाठी दिवस शुभ आहे. मनातील योजना प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करा.

मीन
आज विनाकारण चिंता वाटेल.
मन थोडे भावुक राहू शकते. विश्रांती आणि शांततेची गरज भासेल. ध्यान किंवा प्रार्थनेत मन रमू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *