बीड –पुणे जिल्ह्या नरसापूर येथे घडलेल्या निंदनीय घटनेच्या निषेधार्थ बीडमध्ये सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्याल्यावर मोर्चा काढण्यात आला. आ संदीप क्षीरसागर, भाजप जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख, नगर परिषद उपाध्यक्ष विनोद मुळूक यांच्यासह महिला, पुरुषांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन आरोपीला फासावर देण्याची मागणी केली.
पुणे जिल्ह्यातील नरसापूर येथे घडलेली अल्पवयीन मुलीवरील अत्यंत निंदनीय आणि संतापजनक लैंगिक अत्याचाराची घटना संपूर्ण समाजाला हादरवून टाकणारी आहे. अशा विकृत मानसिकतेच्या नराधमांना समाजात मुळीच स्थान नाही.
या घटनेच्या निषेधार्थ आज बीड शहरातील नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्वपक्षीय नेते मोठ्या संख्येने एकत्र येऊन काढलेला मोर्चा हा केवळ निषेध नसून, न्यायासाठीचा ठाम आवाज आहे. हा जनआक्रोश शासनापर्यंत पोहोचला पाहिजे आणि यावर तात्काळ कठोर कारवाई झाली पाहिजे.या मोर्चात आ संदीप क्षीरसागर, माजी आ सय्यद सलीम, भाजप जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख, नगर परिषद उपाध्यक्ष विनोद मुळूक, नगरसेवक अमर नाईकवाडे, फारूक पटेल,सागर देशपांडे, परशुराम गुरखूदे,महेश धांडे, किशोर पिंगळे,भाजप नेत्या संगीता धसे,प्रज्ञा खोसरे यांच्यासह शेकडो नागरिक हजर होते.
अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर फक्त निषेध पुरेसा नाही, तर आरोपीला जलदगती न्यायालयात खटला चालवून फाशीचीच शिक्षा झाली पाहिजे, अशी जनतेची ठाम मागणी आहे.आज वेळ आली आहे ती केवळ बोलण्याची नाही, तर ठोस कृतीची. समाजातील प्रत्येक घटकाने पुढे येत अशा गुन्ह्यांविरोधात एकजुटीने लढा दिला पाहिजे.





Leave a Reply