News & View

ताज्या घडामोडी

images 2020 07 11T085039.947

आजचे राशीभविष्य!


 सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग 
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४८
🌞 संवत्सर : पराभवनाम
🌕 ॠतु…. वसंत
🚩 उत्तरायण 🌕 चैत्र शुक्ल पोर्णिमा / छत्रपती शिवाजी महाराज पुण्यतिथी ( तिथीप्रमाणे ) पोर्णिमा समाप्ती ०७/४१ मि.
🌸 नक्षत्र…. हस्त
🌸 वार…. गुरुवार
🌼 दिनांक….. ०२ एप्रिल २०२६
🌚 राहुकाल…. दुपारी ०१/३० ते ०३/००
🌞 आजचा दिवस चांगला
🌞 सुर्योदय ०६/२२ मि.
🌘 सुर्यास्त ०६/४० मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩

🚩 शुभभवंतु 🚩

‼️दैनिक राशी भविष्य‼️
‼️दिनांक ०२ एप्रिल २०२६‼️

मेष:- चांगला दिवस आहे. एखादा संदेश संपूर्ण कुटुंबासाठी आनंदाचा दिवस असेल. आज तुम्ही एखाद्याला मदत देऊ केलीत तर गौरव होईल किंवा लोक त्याची दखल घेतील आणि तुम्ही प्रकाशझोतात याल.

वृषभ:- मनाप्रमाणे कार्य होण्यासाठी प्रयत्न करा. आर्थिक कामे मार्गी लागतील. प्रगती साधता येईल. भागीदार तुम्हाला पाठिंबा देतील आणि मदतही करतील. आजचा दिवस अनकूल आहे. कामाच्या ठिकाणी फायदा करून घ्या.

मिथुन:- धन स्थानातील चंद्र सकारात्मक विचारसरणीने स्वत:ला उत्तेजन द्या. तुमच्याकडे आवडत्या कामासाठी पर्याप्त वेळ असेल. कामामध्ये प्रगती साधेल.

कर्क:- केल्याने होत आहे रे! अकर्मण्यता पराजयाचे मूळ आहे. ध्यान व योगाभ्यास करून तुम्ही या मुळाला दूर करू शकतात.आज तुमचे लोक तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करतील. तुमचा दिवस निश्चितच चांगला जाईल.

सिंह:- मनाची घालमेल होईल काही क्षणासाठी उदासिनता जाणवेल. एखादी आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. एखाद्या उपक्रमात स्वत:ला गुंतवाल चांगली वेळ आहे. आजच्या दिवशी स्वत:कडे सकारात्मकपणे पाहा.

कन्या:- लाभातील चंद्र सकारात्मक विचार वाढवा. वडिलधारींचा सल्ला आज लाभ करवून देऊ शकते. कुटुंबातील सदस्यांना मदत करा. दिवास्वप्न पाहणे वाईट नाही – या माध्यमातून तुम्ही काही रचनात्मक विचार मिळवू शकतात.

तुळ:- उत्साहाने कामाला सुरुवात करा. आवडते छंद जोपासा व आनंद वाटेल अशा गोष्टी करा. मनात शांती असेल. सामाजिक धार्मिक कार्यात अग्रेसर असाल. त्यामुळे मनस्वस्थता वाटेल.

वृश्चिक:-रिकाम्या वेळात काही विशेष कार्य करण्याचा प्रयत्न करा. इतरांबरोबर आनंद वाटून घेण्याने आपले आरोग्य बहरून जाईल. आर्थिक लाभ मिळू शकेल.

धनु:- तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला अनुकूल असे वातावरण असेल. कार्यांरंभासाठी चांगला दिवस असेल. मित्र सहकारी यांची मदत होईल.

मकर:- कामाचा डोंगर असला तरी सहज कार्यपूर्ती कराल. उद्योजकता यश मिळवून देईल. वडिलधार्‍यांचे विचार जाणून घ्या. तुमची स्वप्ने सत्यात उतरल्याची प्रचिती मिळेल.

कुंभ:-अनावश्यक ताण घेऊ नका. योगासने प्राणायाम करणे शारिरीक व मानसिक स्वास्थ्यासाठी उत्तम असेल. व्यक्तिमत्व सुधारण्याचे केलेल्या प्रयत्नांचे समाधानकारक फळ मिळेल.
आर्थिक कामे होतील.

मीन:- संवाद कौशल्ये आणि कामातील कौशल्ये प्रभावी ठरू शकतील. नियोजित कामामध्ये यशस्वी होण्यासाठी चांगला दिवस आहे. वरिष्ठांचे मार्गदर्शन व आशिर्वाद मिळतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *