सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. वसंत
🚩 उत्तरायण 🌕 फाल्गुन कृष्ण द्वादशी
🌸 नक्षत्र…. धनिष्ठा
🌸 वार…. सोमवार
🌼 दिनांक….. १६ मार्च २०२६
🌚 राहुकाल…. सकाळी ०७/३० ते ०९/००
🌞 आजचा दिवस चांगला
🌞 सुर्योदय ०६/४९ मि.
🌘 सुर्यास्त ०६/३५ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩
🚩 शुभभवंतु 🚩
‼️ दैनिक राशी भविष्य‼️
‼️ दिनांक १६ मार्च २०१६‼️
मेष
आज नवमस्थानी चन्द्र आहे.
शैक्षणिक यश लाभेल. एखादे महत्त्वाचे काम पूर्ण होऊ शकते. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान मिळण्याची शक्यता आहे.कुटुंबातील सदस्य किंवा गुरुस्थानी व्यक्तीकडून मार्गदर्शन मिळेल. घरात सकारात्मक वातावरण राहील.
वृषभ
आज अष्टमात चन्द्र आहे.
काही गोष्टी अचानक बदलू शकतात, त्यामुळे संयम ठेवणे महत्त्वाचे आहे.आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. अनावश्यक खर्च टाळणे योग्य ठरेल.
मिथुन
आज सप्तमात चन्द्र आहे.
जोडीदार किंवा जवळच्या व्यक्तीसोबत छोट्या गोष्टींवर मतभेद होऊ शकतात, त्यामुळे शांतपणे संवाद साधणे आवश्यक आहे.भागीदारीत किंवा टीमवर्कमध्ये काम केल्यास चांगले परिणाम मिळतील. चर्चा आणि संवादातून मार्ग निघेल
कर्क
आज षष्ठात चन्द्र आहे.
आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या. अनावश्यक खर्च टाळा. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने आनंद मिळेल. कामाची धावपळ, जबाबदाऱ्या आणि छोट्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
सिंह
आज पंचमात चन्द्र आहे.
आज आत्मविश्वास वाढेल.प्रेमसंबंध किंवा कुटुंबातील नातेसंबंधात आनंद मिळेल. मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. सामाजिक क्षेत्रात नवीन संधी मिळू शकतात. महिलांसाठी प्रगतीचा दिवस.
कन्या
आज चतुर्थ स्थानी चन्द्र आहे.घराशी संबंधित काही कामे पूर्ण करण्याची संधी मिळू शकते.
कामाचा ताण जाणवू शकतो. आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. विश्रांती घेतल्यास मन शांत राहील.
तुळ
आज तृतीयात चन्द्र आहे.मित्रमैत्रिणी किंवा भावंडांशी संवाद वाढेल. छोट्या प्रवासाचे योगही संभवतात. सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकते.
वृश्चिक
आज धनस्थानी चन्द्र आहे.आर्थिक बाबी, कुटुंब आणि बोलण्यावर विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
कामात मेहनत वाढेल. संयम ठेवून काम केल्यास चांगले परिणाम मिळतील. भावनांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.
धनु
आज
चंद्र तुमच्या राशीत असल्याने आत्मविश्वास वाढेल. नवीन योजना सुरू करण्यासाठी दिवस चांगला आहे.लक्ष्मी प्राप्तीचे योग.रेंगाळलेली कामे मार्गी लागतील.तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाईल.
मकर
आज व्यय स्थानी चन्द्र आहे.
आज खर्च वाढण्याची शक्यता आहे. आर्थिक नियोजन करणे आवश्यक आहे. शांतपणे निर्णय घ्या. अनावश्यक खर्च टाळणे चांगले. कामात थोडी धावपळ होऊ शकते.नात्यात गैरसमज टाळा.
कुंभ
आज लाभात चन्द्र आहे.
.मित्रमैत्रिणी आणि सहकाऱ्यांसोबत संबंध मजबूत होतील. एखादी आनंदाची भेट किंवा कार्यक्रम होऊ शकतो.कामात धाडसाने पाऊल टाकल्यास प्रगतीचे मार्ग खुलतील.
मीन
आज
कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाऊ शकते. वरिष्ठ किंवा अनुभवी व्यक्तीकडून मार्गदर्शन मिळण्याची शक्यता.मन द्विधा राहील.नोकरी आणि घरकाम यात ओढाताण होऊ शकते.












Leave a Reply