News & View

ताज्या घडामोडी

images 2020 07 11T085039.947

आजचे राशीभविष्य!


 सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग 
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. वसंत
🚩 उत्तरायण 🌕 फाल्गुन कृष्ण तृतीया / छत्रपती शिवाजी महाराज जयंती ( तिथीप्रमाणे )/ संकष्टी चतुर्थी चंद्रोदय ०९/०५मि.
🌸 नक्षत्र…. हस्त
🌸 वार…. शुक्रवार
🌼 दिनांक….. ०६ मार्च २०२६
🌚 राहुकाल…. सकाळी १०/३० ते १२/००
🌞 आजचा दिवस शुभ
🌞 सुर्योदय ०६/४९ मि.
🌘 सुर्यास्त ०६/३५ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩

🚩 शुभभवंतु 🚩

‼️ दैनिक राशी भविष्य‼️
‼️ दिनांक ०६ मार्च २०२६‼️

मेष:- अनुकूल दिवस आहे. प्रयत्नाने व्यवसायात वाढ होईल. आर्थिक लाभ होतील. कामे पूर्ण होतील. मित्र संबंधी लोकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळेल.

वृषभ:- पराक्रम कराल काही कामे मनासारखी होतील. आध्यत्मिक उन्नतीसाठी चांगला कालावधी आहे. कुलदेवीची उपासना करा.

मिथुन:- मन प्रसन्न राहील. उत्साहपूर्ण वातावरण मिळाल्याने कामाच्या ठिकाणी नाकरात्मक भाव असला तरी कामात आनंद वाटेल.

कर्क:- सकारात्मक विचाराने कामामध्ये लक्ष द्यावे. नविन खरेदी होईल. मित्र स्नेही मदत करतील. खर्चात वाढ होऊ शकते.

सिंह:- अनावश्यक खर्च टाळा. दुसर्‍यांना समजून घेवून कामे पूर्ण करा. गरजूना मदत करा. जुन्या चुकांची पुनरावृत्ती होणार नाही यासाठी दक्ष राहावे.

कन्या:- योग्य नियोजन होईल व्यावसायिक प्रतिस्पर्धी शरण येतील. अचानक लाभ होतील. मनातील द्विधास्थिती सोडून सकारात्मक राहा.

तुळ:- कौटुंबिक वातावरण अनुकूल असेल. प्रसन्नतेने कार्य कराल. व्यावसायिक जागेत बदल संभवतो. सुखद धक्का बसेल.

वृश्चिक:- काळजीपूर्वक निर्णय घेणे विश्वासाला तडा जाणार नाही याची काळजी घ्या. प्रलोभनापासून दूर राहिल्यास.

धनु:- चांगला दिवस आहे. उत्साही आनंदी गोष्टी घडतील. कुटुंबातील सर्वांना कार्यात समावून घ्या.

मकर:- मन आनंदी राहील. सौख्य लाभेल. भागिदाराकडून व्यवसाय वाढेल सहकार्य लाभेल. अर्थकारण मजबूत होईल.

कुंभ:- आत्मविश्वास वाढेल. दिवस आनंदात व्यतीत कराल. महत्वाची कामे मार्गी लागतील. हितचिंतकाकडून लाभ होईल.

मीन:- मनाची चंचलता वाढेल. त्यामुळे प्रत्यक्ष कामात लक्ष लागणार नाही. व्यापारात लाभ होतील. मात्र नियोजन बदलेल. छोटे प्रवास घडतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *