सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. वसंत
🚩 उत्तरायण 🌕 फाल्गुन कृष्ण प्रथमा / करिदिन
🌸 नक्षत्र…. पुर्वा
🌸 वार…. बुधवार
🌼 दिनांक….. ०४ मार्च २०२६
🌚 राहुकाल…. दुपारी १२/०० ते ०१/३०
🌞 आजचा दिवस शुभ
🌞 सुर्योदय ०६/४९ मि.
🌘 सुर्यास्त ०६/३५ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩
🚩 शुभभवंतु 🚩
‼️ दैनिक राशी भविष्य‼️
‼️ दिनांक ०४ मार्च २०२६‼️
मेष
आज
आज आर्थिक विषय केंद्रस्थानी राहतील. उत्पन्न वाढीचा विचार, साईड इनकम किंवा गुंतवणुकीची योजना करू शकता. कुटुंबात काही निर्णय तुमच्यावर सोपवले जातील. रागावर नियंत्रण ठेवा. जोडीदाराशी हट्टीपणा टाळा.
करिअरमध्ये वरिष्ठांकडून कौतुक.
डोकेदुखी/डोळ्यांचा त्रास संभव.
वृषभ
आज
चंद्र आपल्या राशीत असल्याने आत्मविश्वास प्रचंड वाढेल. व्यक्तिमत्त्व प्रभावी राहील. विवाहाचे योग जुळतील, प्रेमसंबंध किंवा नवीन प्रस्तावाबाबत सकारात्मक संकेत.
करिअर मध्ये नवीन संधी मिळू शकते.
आर्थिक दृष्टीने लाभदायक दिवस.
आरोग्य: गोड पदार्थ जास्त टाळा.
मिथुन
आज व्यय स्थानी चन्द्र आहे.
मनात गोंधळ राहू शकतो. काही गुप्त चिंता त्रास देऊ शकतात. खर्च वाढण्याची शक्यता आहे. संयम आवश्यक.
गुप्त शत्रूंपासून सावध रहा.
नात्यात गैरसमज टाळा.
कर्क
आज
मित्र व संपर्कातून फायदा होईल. एखादी शुभ बातमी मिळेल. नवीन योजना यशस्वी ठरू शकते.
आर्थिक लाभाचे योग.
जोडीदारासोबत आनंददायी क्षण व्यतीत कराल.
सिंह
आज
कार्यक्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. घर-कार्यालय समतोल साधणे आवश्यक.
आर्थिक स्थिरता येईल.
कामाचा थकवा जाणवेल.
कन्या
आज
भाग्याची साथ आहे. उच्च शिक्षण, परदेश प्रवास किंवा धार्मिक कार्यासाठी अनुकूल दिवस.
नवीन शिकण्याची संधी येईल.
जोडीदाराचे सहकार्य लाभेल.
तुळ
आज
भावनिक चढउतार संभव. गुंतवणूक करताना काळजी घ्या. गुप्त गोष्टी उघड होऊ शकतात.
जोडीदाराशी स्पष्ट संवाद ठेवा.
वृश्चिक
आज
संबंध, भागीदारी आणि विवाह इच्छुकांना अनुकूल. नवीन व्यावसायिक करार लाभदायक.
प्रेमात गोडवा वाढेल.
भागीदारीत लाभ.
धनु
आज
कामाचा ताण वाढेल पण यश निश्चित. आरोग्याची काळजी घ्या.
नियमित उत्पन्न राहील.
कौटुंबिक छोट्या वादाकडे दुर्लक्ष करा.
मकर
आज
संतानसुख, प्रेमसंबंधात प्रगती. सर्जनशील कामात यश. अचानक लाभ संभव.
कुंभ
आज
घर, मालमत्ता, वाहन विषय अनुकूल. आईच्या आरोग्याकडे लक्ष द्या.
घरखर्च वाढेल.
मीन
आज
संवादातून कामे पूर्ण होतील. छोटा प्रवास संभव. भावंडांचे सहकार्य मिळेल.
आर्थिकबाबतीत छोटा लाभ.
जोडीदाराशी मनमोकळा संवाद लाभदायक.












Leave a Reply