सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. वसंत
🚩 उत्तरायण 🌕 फाल्गुन शुक्ल पोर्णिमा / धुलीवंदन / करी दिन पोर्णिमा समाप्ती साय. ०५/०७ मि.
🌸 नक्षत्र…. मघा
🌸 वार…. मंगळवार
🌼 दिनांक….. ०३ मार्च २०२६
🌚 राहुकाल…. दुपारी ०३/०० ते ०४/३०
🌞 आजचा दिवस शुभ
🌞 सुर्योदय ०६/४९ मि.
🌘 सुर्यास्त ०६/३५ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩
🚩 शुभभवंतु 🚩
‼️ दैनिक राशी भविष्य‼️
‼️ दिनांक ०३ मार्च २०२६‼️
मेष: आज उत्साह व आत्मविश्वासपूर्वक कार्य कराल. नियोजित कामामध्ये प्रगती साधेल. बोलण्यातून हितचिंतक दुखावणार नाही याची काळजी घ्या.
वृषभ: खर्च करतांना विचार पूर्वक खर्च करा अनावश्यक गोष्टीत खर्च वाढण्याची शक्यता आहे. आर्थिक कामामध्ये प्रगती साधेल.
मिथुन: कामामध्ये प्रगती साधेल.मित्रपरिवाराकडून सहकार्य मिळेल. भेटीगाठीतून संवादातून कार्य सुलभ होईल. आर्थिक काम होईल
कर्क: आपल्या कार्य कुशलतेने वरिष्ठ खुश होतील. सन्मान प्रतिष्ठा वाढेल. घरगुती जबाबदाऱ्या वाढतील. काळजीपूर्वक संवाद साधा.
सिंह: चांगला दिवस आहे. प्रवास घडेल. धार्मिक कार्यात भाग घ्याव. मन प्रसन्न राहील. समर्पण भावनेतून काम होईल. मित्र संगतीतून आनंद मिळेल.
कन्या: लक्षपूर्वक काम करा. नियोजनाप्रमाणे यश मिळेल.
विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. अनावश्यक खर्च होऊ शकतो.
तुळ: मित्र सहकारी यांचे सहकार्य लाभेल. कामामध्ये प्रगती साधेल. सुसंवादाने मनाप्रमाणे यश मिळू शकते. आर्थिक कामे होतील.
वृश्चिक: नविन जबाबदारी वाढेल. कामाचा ताण वाढेल आपल्या कौशल्याने यश निश्चित मिळेल. परिवारिक संबंधातील दुरावा कमी करण्यासाठी संयमाने राहा.
धनु: आनंदी दिवस आहे. कामामध्ये लक्ष केंद्रित कराल. विद्यार्थ्यांना यश मिळेल. परिवारीक जीवनात संयमाने घ्या. मतभेदाची शक्यता आहे.
मकर: संवादाने प्रश्न सुटतील. कामामध्ये क्लिष्टपणा राहणार नाही याची काळजी घ्या. व्यवहार लाभदायक ठरतील. स्पष्टवक्तेपणा टाळावा.
कुंभ: परिवारिक जीवनात चांगले संबंध होतील. जवळचे प्रवास संभवतात. मध्यस्थी करणे टाळा. आर्थिक नियोजन महत्वाचे असेल.
मीन: साधारण दिवस आहे. गरजेच्या वस्तुंची खरेदी होईल त्यातून लाभ मिळेल. संयमाने घ्या दिवसाचा आनंद घ्या. कौटुंबिक जीवन चांगले राहील.












Leave a Reply