बीड- राज्याच्या राजकारणात रविवारी एकीकडे राजकीय भूकंप घडत असताना बीड विधानसभा मतदार संघाचे आमदार संदिप क्षीरसागर हे मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सोबत असल्याचे दिसून येत आहे.
राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार,छगन भुजबळ, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ,आदिती तटकरे,धर्मराव आत्राम,संजय बनसोडे यांच्यासारखे दिगग्ज नेते सरकारमध्ये सामील होत आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसचे नऊ आमदार मंत्रीपदाची शपथ घेतील.
यावेळी बीड जिल्ह्यातून धनंजय मुंडे हे अजित दादा सोबत आहेत मात्र बीडचे आ संदिप क्षीरसागर हे मात्र शरद पवार यांच्या सोबतच असल्याचे स्पष्ट झाले आहे.पहाटेचा शपथविधी झाला तेव्हा देखील राजभवणावरून संदिप क्षीरसागर थेट शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक वर दाखल झाले होते.त्यानंतर आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस उभी फुटत असताना संदिप क्षीरसागर हे मोठ्या पवार यांच्यासोबत आहेत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
Leave a Reply