सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. वसंत
🚩 उत्तरायण 🌕 फाल्गुन शुक्ल आमलकी एकादशी / मराठी भाषा गौरव दिन
🌸 नक्षत्र…. आद्रा
🌸 वार…. शुक्रवार
🌼 दिनांक….. २७ फेब्रुवारी २०२६
🌚 राहुकाल…. सकाळी १०/३० ते १२/००
🌞 आजचा दिवस चांगला
🌞 सुर्योदय ०७/०५ मि.
🌘 सुर्यास्त ०६/२५ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩
🚩 शुभभवंतु 🚩
‼️ दैनिक राशी भविष्य ‼️
‼️ दिनांक २७ फेब्रुवारी २०२६‼️
मेष
आज
आज तुम्ही घर-काम आणि बाहेरील जबाबदाऱ्या दोन्ही उत्तमरीत्या सांभाळाल. चंद्र-गुरू योगामुळे मोठ्यांचे मार्गदर्शन लाभेल. मुलांबाबत एखादा निर्णय घ्याल. आरोग्याची थोडी काळजी घ्या, विशेषतः थकवा जाणवू शकतो.
वृषभ
आज
मन स्थिर राहील, पण जबाबदाऱ्यांचे ओझे जाणवेल. चंद्र-शनी युतीमुळे कामात शिस्त आवश्यक आहे. आर्थिक बाबतीत आज अनावश्यक खर्च टाळलेला बरा. जोडीदाराशी संवाद ठेवल्यास गैरसमज टळतील.
मिथुन
आज
चंद्र केंद्र बुध योगामुळे आज तुमची बोलण्याची शैली प्रभावी राहील. महिलांसाठी लेखन, संवाद, शिक्षण किंवा सल्लागार कामात यश मिळू शकते.
मित्रमैत्रिणींशी मनमोकळा संवाद होईल.
कर्क
आज
घरगुती प्रश्नांवर आज तोडगा निघू शकतो. चंद्र-गुरू त्रिकोणामुळे मनाला आधार मिळेल. स्त्रियांसाठी कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती कडुन सल्ला मिळण्याचा योग आहे. भावनिक स्थैर्य वाढेल.
सिंह
आज
आज स्वतःकडे थोडे लक्ष द्यावेसे वाटेल. चंद्र-शनी युतीमुळे मनात गंभीर विचार येतील. करिअर किंवा भविष्यासंदर्भात ठोस निर्णय घेण्याचा दिवस आहे. संयम ठेवल्यास लाभ होईल.
कन्या
आज
चंद्र केंद्र बुध योगामुळे कामात अचूकता आणि नियोजन उत्तम राहील. ऑफिसमध्ये किंवा घरात तुमच्या मताला महत्त्व मिळेल. आरोग्यासाठी पाणी आणि विश्रांती आवश्यक.
तुळ
आज
नातेसंबंधात स्पष्टता येईल. आज मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. चंद्र-गुरू योगामुळे सकारात्मक विचार वाढतील. एखाद्या जुन्या मैत्रीशी पुन्हा संपर्क होऊ शकतो.
वृश्चिक
आज
चंद्र-शनी युतीमुळे मनात थोडी अस्वस्थता जाणवू शकते, पण ती तात्पुरती आहे. ध्यान, प्रार्थना किंवा शांत वेळ स्वतःसाठी ठेवल्यास बरे वाटेल.
धनु
आज
आजचा दिवस आशावादी आहे. चंद्र-गुरू त्रिकोणामुळे आत्मविश्वास वाढेल. शिकण्याचे, नवे विचार स्वीकारण्याचे योग आहेत. प्रवास किंवा ऑनलाईन कामातून लाभ होऊ शकतो.
मकर
आज
जबाबदाऱ्या वाढलेल्या जाणवतील. चंद्र-शनी युतीमुळे कामाचा ताण असला तरी यश मिळेल. घरातील मंडळीनी आज आरोग्य आणि विश्रांतीकडे लक्ष द्यावे.
कुंभ
आज
चंद्र तुमच्याच राशीत असल्यामुळे आज स्वतःला समजून घेण्याचा दिवस आहे. प्रवासात त्रास होऊ शकतो. स्वतःचे मत ठामपणे मांडण्याचा उत्तम काळ.ऐहिक सुख लाभेल.
मीन
आज
आज अंतर्मुख होण्याची गरज वाटेल. चंद्र-गुरू योगामुळे अध्यात्मिक कामात मन रमेल. एखाद्या मैत्रिणीचा आधार मिळू शकतो.












Leave a Reply