सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. वसंत
🚩 उत्तरायण 🌕 फाल्गुन शुक्ल नवमी
🌸 नक्षत्र…. रोहिणी
🌸 वार…. बुधवार
🌼 दिनांक….. २५ फेब्रुवारी २०२६
🌚 राहुकाल…. दुपारी १२/०० ते ०१/३०
🌞 आजचा दिवस चांगला
🌞 सुर्योदय ०७/०५ मि.
🌘 सुर्यास्त ०६/२५ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩
🚩 शुभभवंतु 🚩
‼️ दैनिक राशी भविष्य ‼️
‼️ दिनांक २५ फेब्रुवारी २०२६‼️
मेष
आज
आज कामात शिस्त ठेवावी लागेल. घर आणि नोकरी दोन्हीकडे जबाबदाऱ्या वाढतील. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या.आज आरोग्याकडे लक्ष द्यावे, विशेषतः थकवा जाणवू शकतो.
वृषभ
आज
बुद्धीचा योग्य वापर केल्यास अडलेली कामे मार्गी लागतील. आज संवाद कौशल्य महत्त्वाचे ठरेल. खर्च वाढू शकतो, पण आवश्यक कामासाठी असेल. कुटुंबात समजूतदारपणा ठेवा.
मिथुन
आज
चंद्र–बुध योगामुळे विचार स्पष्ट राहतील. ऑफिसमध्ये/ कामाच्या ठिकाणी आज तुम्हाला महत्त्व मिळेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल. भावनिक बाबतीत मात्र घाईघाईने निर्णय टाळा.
कर्क
आज
नातेसंबंधात थोडा ताण जाणवू शकतो. कुटुंबीयांशी शांतपणे संवाद साधा. कामाच्या ठिकाणी संयम ठेवल्यास फायदा होईल. आरोग्यासाठी पुरेशी विश्रांती घ्या.
सिंह
आज
आज तुमचं नेतृत्व गुण दिसून येतील. आज कामात प्रशंसा किंवा मान मिळण्याची शक्यता आहे.आर्थिक बाबतीत फायदा होईल. मात्र अहंकार टाळावा.
कन्या
आज
चंद्र लाभ बुध असल्यामुळे आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला आहे. आज शिक्षण, लेखन, प्लॅनिंगमध्ये यश मिळेल. घरात एखादा महत्त्वाचा निर्णय घेता येईल.
तुळ
आज
शुक्र–हर्षल योगामुळे मन अस्थिर राहू शकते. नात्यांमध्ये गैरसमज टाळा. खर्च अचानक वाढू शकतो. सौंदर्य, कला, फॅशनशी संबंधित नवे विचार सुचतील.
वृश्चिक
आज
आज तुमची मानसिक ताकद वाढेल. कामात एकाग्रता राहील. आज गुप्त गोष्टी उघड न करण्याची काळजी घ्यावी. आरोग्य ठीक राहील.सोशल मीडियावर एखादी टिप्पणी चे कौतुक होईल.
धनु
आज
नवीन योजना आखण्यासाठी दिवस योग्य आहे. आज बुद्धी आणि अनुभव यांचा सुंदर संगम होईल. प्रवास किंवा महत्त्वाची भेट होण्याची शक्यता.
मकर
आज
चंद्र तुमच्या राशीत असल्यामुळे आजचा दिवस महत्त्वाचा. जबाबदाऱ्या वाढतील पण त्या तुम्ही उत्तम पार पाडाल. आज कामात स्थैर्य आणि आत्मविश्वास मिळेल.
कुंभ
आज व्यय स्थानी चन्द्र आहे.
आज थोडी मानसिक अस्वस्थता जाणवू शकते. अनावश्यक विचार टाळा. आरोग्याकडे लक्ष द्यावे. खर्चावर नियंत्रण ठेवा.
मीन
आज लाभ स्थानी चन्द्र आहे.प्रवासातून लाभ होईल.
मैत्री मुळे फायदा होईल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. कामात नवीन संधी दिसू शकते. भावनिक समाधान मिळेल.प्रवास घडेल.












Leave a Reply