News & View

ताज्या घडामोडी

IMG 20260224 WA0010

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन!

बीड -ग्रामसेवक, शिक्षक, ट्रेसर यांच्यासोबत नोकरीस लागलेल्या आणि वेतन निश्चिती झालेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांवर मात्र गेल्या पन्नास साठ वर्षात अन्यायचं झालेला आहे. सर्वांचे वेतन मोठ्या प्रमाणात वाढले मात्र जी p कर्मचारी तुटपुंज्या वेतणावर आजही काम करत आहेत. या विरोधात बीड जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामबंद आंदोलन करत धरणे केले.

वेतन त्रुटी तात्काळ दूर करून योग्य वेतनश्रेणी लागू करणे,पदोन्नती प्रक्रियेला गती देऊन वरिष्ठतेनुसार न्याय देणे,रिक्त पदे तातडीने भरून कामाचा ताण कमी करणे,समान कामासाठी समान वेतनाची अंमलबजावणी,सेवा अटी व नियमांमध्ये सुधारणा करून कर्मचाऱ्यांना दिलासा देणे,जुन्या प्रलंबित भत्ते व देयके तातडीने अदा करणे या मागण्यांसाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामबंद आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनात शासकीय, निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटनेचे जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *