News & View

ताज्या घडामोडी

images 2020 07 11T085039.947

आजचे राशीभविष्य!


 सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग 
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. शिशिर
🚩 उत्तरायण 🌕 माघ कृष्ण अष्टमी
🌸 नक्षत्र…. विशाखा
🌸 वार…. सोमवार
🌼 दिनांक….. ०९ फेब्रुवारी २०२६
🌚 राहुकाल… सकाळी ०७/३० ते ०९/००
🌞 आजचा दिवस चांगला
🌞 सुर्योदय ०७/१० मि.
🌘 सुर्यास्त ०६/०५ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩

🚩 शुभभवंतु 🚩

‼️दैनिक राशी भविष्य ‼️
‼️ दिनांक ०९ फेब्रुवारी २०२६‼️

मेष: हितशत्रुंपासून सावधानता राखावी. मित्र कुटुंबिय आपणाला मदत करतील. ध्यान प्राणायाम करावा. आर्थिक कामे मार्गी लागतील.

वृषभ: व्यापार व्यवसायात अनुकूल बदल घडतील. भागीदारीत लाभ होईल. नियोजित भेटीगाठी कौटुंबिक वातावरण आनंदी करतील.

मिथुन: कामाची जबाबदारी वाढेल. आर्थिक लाभ होतील. शक्य त्याच कामाचा शब्द द्या. विचारपूर्वक निर्णय घेणे लाभदायक होईल.

कर्क: पराक्रमातील चंद्र उत्साहवर्धक असेल. केलेल्या कामातून आनंद मिळवाल. विद्यार्थ्यांना अभ्यास, स्पर्धा कामात यश मिळेल.

सिंह: संवादात स्पष्टता ठेवा. कौटुंबिक संवाद कार्यसाधक होतील. घरगुती सुख मिळेल. स्थावरासंबंधित कामाला गती मिळेल.

कन्या: आपल्या राशीत चंद्र आहे. नियमित कामात संवाद कौशल्यामुळे यश मिळेल. समाधानकारक दिवस आहे. नातेवाईकांचे सहकार्य लाभेल.

तुळ: नियोजित कामामधून कुटुंबात समाधानकारक वातावरण राहील. आर्थिक कामे होतील. अनावश्यक खर्च टाळावा. चिंतन करा चिंता सोडा.

वृश्चिक: लाभस्थानात चंद्र आहे. आत्मविश्वास वाढेल. उत्साहाने कार्य कराल. निर्णय विचारपूर्वक घ्या. आर्थिक कामे होतील.

धनु: उपासना आध्यात्म याची आवड मनाला प्रसन्नता देईल.
भेटी गाठीतून कार्यसिध्दि होईल. संवादातून संभ्रम दूर होतील.

मकर: पूर्व संकल्पित काम मार्गी लागल्याचा आनंद असेल. अपेक्षित लाभ होईल. मित्रांकडून सहकार्‍यांकडून मदत मिळेल.

कुंभ: कामाचा उरक चांगला राहील. वेळेत काम झाल्याने वरिष्ठांकडून प्रशंसा होईल. नविन जबाबदारी वाढेल.

मीन: नियोजित कामात प्रगती होईल. प्रवास कार्यसाधक होतील. भाग्याची साथ मिळेल. धार्मिक कामामध्ये भाग घेण्याचे योग आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *