News & View

ताज्या घडामोडी

IMG 20260203 WA0015

पैशाच्या वादातून काढला मित्राचा काटा!दहा तासात आरोपी गजाआड!

शिरूर कासार – बीड जिल्ह्यात गेल्या काही दिवसात खून, मारामारीच्या घटनामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशातच शिरूर कासार तालुक्यातील रायमोहा येथे घडलेल्या तरुणाच्या निर्घृण खून प्रकरणाचा उलगडा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या दहा तासांच्या आत करून आरोपीला अटक केली आहे.

चांद अल्हाहुद्दीन तांबोळी (वय ३०, रा. रायमोहा) असे मृत व्यक्तीचे नाव असून तो व्यवसायाने पेंटर होता. रविवारी (दि. १ फेब्रुवारी) सकाळी तो “बीडला जातो” असे सांगून स्वतःच्या मोटारसायकलवरून घरातून निघाला होता. मात्र तो रात्रीपर्यंत परत न आल्याने कुटुंबीयांनी हरवल्याची तक्रार दाखल केली होती.

सोमवारी सकाळी रायमोहा परिसरात त्याचा मृतदेह आढळून आला. डोक्यावर दगडाने मारहाण केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले असून त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती.

या खुणातील आरोपी; अतिक गुलाब तांबोळी वय -29 रा. इस्लामपुरा बीड असे असून त्याला चांद ने उसने दीड लाख रुपये दिले होते. हे पैसे चांद सातत्याने मागत होता, अशातच अतिक चे लग्न ठरले, त्यावेळी तु पैसे दिले नाहीस तर लग्नात येऊन राडा करेल अशी धमकी चांद ने दिली होती. त्यामुळेच अतिक ने रविवारी रात्रीच चांद चा काटा काढला.

अटक करण्यात आलेल्या आरोपीला पुढील तपासासाठी शिरूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. अवघ्या बारा तासांत खून प्रकरणाचा छडा लावल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

ही कारवाई  स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड,पीएसआय खटावकर पीएसआय सुतुळे, अशोक दुबाले,राहुल शिंदे,सोमनाथ गायकवाड,मारुती कांबळे,बाळू सानप,अश्फाक सय्यद,मनोज परजने,अतुल हराळे, अलीम शेख, विकी सुरवसे व स्थानिक गुन्हे शाखेची टीम यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *