News & View

ताज्या घडामोडी

teacher 2

कोरोना काळात हजारो बोगस शालार्थ आय डी!

बीड – बोगस शालार्थ आयडी च्या माध्यमातून हजारो शिक्षकांकडून कोट्यावधी रुपयांचा म** गोळा करणारे शिक्षण विभागातील अधिकारी कर्मचारी आणि संस्थाचालक यांनी कोरोना काळात सुद्धा बोगस शालार्थ आयडी च्या माध्यमातून हजारो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची नियुक्ती केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. संभाजीनगर विभागात दहा ते बारा हजार शिक्षकांची कोरोना काळात नियुक्ती झाली असून यात बीड जिल्ह्यातील जवळपास दीड ते दोन हजार शिक्षकांची नियुक्ती झाली आहे या नियुक्ती पाठीमागे असणारा बीडचा तो दलाल कोण अशी चर्चा सुरू झाली आहे.

कोरोना काळात शालार्थ आयडी’ दिलेल्या प्रकरणांची संख्या थक्क करणारी असल्याची चर्चा आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली असे जिल्हे येतात. २०१९ ते २०२५ पर्यंत शालार्थ आयडी दिलेल्या प्रकरणांची संख्या गलेलठ्ठ असल्याचे समोर आले आहे. विभागात एकट्या उपसंचालक कार्यालयाकडून प्राथमिक, माध्यमिकस्तरावरील १० हजार ६० शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शालार्थ आयडी दिल्याचे आकडेवारीवरुन समोर आले
राज्यातील बोगस शिक्षक भरती प्रकरणी राज्यात अनेक अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. मराठवाड्यात बीड, लातूर अशा अनेक जिल्ह्यातही शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना बोगस नियुक्ती दिली गेल्याच्या तक्रार दाखल झालेल्या आहेत. मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांत करोना काळातही मोठ्या प्रमाणात शालार्थ आयडी दिल्याचे समोर आले आहे. प्रत्यक्ष शाळा सुरू नव्हत्या.

कार्यालयांसाठीही करोनाकाळात निर्बंध होते. असे असतानाही विभागात सुमारे उपसंचालक कार्यालयाकडून सुमारे चार हजार शालार्थ आयडी मंजूर करण्यात आल्याचे सांगण्यात येते. यात काही संचिका गहाळ असल्याचेही समजते.

विभागीय उपसंचालक कार्यालयातंर्गत आकडेवारी
जिल्हा – प्राथमिक – माध्यमिक (२०१९ ते २०२२ पर्यंत शालार्थ आयडी)
• छत्रपती संभाजीनगर – ६३७ – ८१७
• जालना – २२४ – ६६६
• बीड – ४५४ – ६३६
• परभणी – ३७१ – ७३२
• हिंगोली – १४४ – २७७

जिल्हा प्राथमिक माध्यमिक (२०२२ ते २०२५ पर्यंत शालार्थ आयडी)
• छत्रपती संभाजीनगर – १०६३ – ८६३
• जालना – १६९ – ४३२
• बीड – ४६३ – ७९७
• परभणी – ३५८ – ४८८
• हिंगोली – १६५ – ३०६

मराठवाड्यातील बहुतांश शिक्षण संस्थांमध्ये बीडच्याच एका दलालाने लाखो रुपये घेत अधिकारी ते मंत्रालय मॅनेजमेंट लावून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची बोगस भरती केल्याचे स्पष्ट झाले आहे हा दलाल अनेक शाळा व्यवस्थापनांना हाताशी धरून अधिकाऱ्यांकडून त्यांची कामे करून घेतो. विशेष बाब म्हणजे या दलालाने वेतन व निर्वाह निधी पथक अर्थात पे युनिट मधील अधिकाऱ्यांना देखील लाखो रुपये वाटून बोगस कागदपत्रांच्या आधारे नोकरीला लावलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांची पगार बिले काढण्याचा उद्योग केलेला आहे.

एस आय टी ची स्थापना झाल्यानंतर बीड जिल्ह्यातील बोगस शालार्थ आयडी च्या माध्यमातून नोकरीला लागलेल्या कर्मचाऱ्यांची माहिती जमा झाली असून लवकरच यांची प्रत्यक्ष सुनावणी सुरू होईल आणि त्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल केले जातील अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *