News & View

ताज्या घडामोडी

images 1

पेठ बीडमधील व्यापाऱ्याच्या घरी छापा!

बीड -पेठ बीड भागात शनी मंदिर शेजारी राहणाऱ्या एका व्यापाऱ्याच्या घरावर केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी छापा घातला. पहाटे पासून छत्रपती संभाजीनगर, पुणे येथील अधिकारी या व्यापाऱ्याच्या घराची तपासणी करत आहेत. बाहेर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

डिझीटल प्रिंटींग तसेच प्लॉटिंग च्या व्यवसायातून कोट्याधीश झालेल्या पेठ बीड भागातील एका व्यापाऱ्याच्या घरी पहाटेच केंद्रीय तपास यंत्रणाच्या अधिकाऱ्यांनी छापा घातला.

शनी मंदिर शेजारी राहणाऱ्या या व्यापाऱ्याच्या मुलाने कोट्यावधी रुपयांची टॅक्स चोरी तसेच बोगस जी एस टी बिल दाखवले असल्यामुळे या तपास यंत्रणा घरी धडकल्या असल्याची चर्चा आहे.

या यंत्रनेतील अधिकाऱ्यांनी संपूर्ण घराची चार पाच तासापेक्षा जास्त झडती घेतली. व्यापाऱ्याच्या दाराबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने या भागात बघ्यांची मोठी गर्दी झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *