News & View

ताज्या घडामोडी

images 2020 07 11T085039.947

आजचे राशीभविष्य!


 सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग 
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. शिशिर
🚩 उत्तरायण 🌕 माघ शुक़्ल तृतीया
🌸 नक्षत्र…. धनिष्ठा
🌸 वार…. बुधवार
🌼 दिनांक….. २१ जानेवारी २०२६
🌚 राहुकाल… दुपारी १२/०० ते ०१/३०
🌞 आजचा दिवस शुभ
🌞 सुर्योदय ०७/१० मि.
🌘 सुर्यास्त ०५/५५ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩

🚩 शुभभवंतु 🚩

‼️ दैनिक राशी भविष्य ‼️
‼️दिनांक २१ जानेवारी २०२६‼️

मेष
आज
आज आत्मविश्वास जबरदस्त राहील. कामात पुढाकार घ्याल. महत्वाची कामे सकाळीच करून घ्या.मात्र बोलताना थोडी घाई होऊ शकते. आज स्वतःचे मत ठामपणे मांडण्याचा दिवस.

वृषभ
आज
आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या. दुपारनंतर खर्च वाढू शकतो. कुटुंबातील महिलांनी शांत राहिल्यास वातावरण सौहार्दपूर्ण राहील.

मिथुन
आज
बुध–मंगळ योगामुळे बुद्धी आणि बोलण्याची धार वाढेल. लेखन, बोलणे, शिकवणे यासाठी उत्तम दिवस. मात्र शब्दांवर नियंत्रण ठेवा.

कर्क
आज
रवी–चंद्र युतीमुळे भावनिक चढ-उतार जाणवतील. आज स्वतःच्या भावना समजून घेणे महत्त्वाचे. संध्याकाळनंतर मन स्थिर होईल.

सिंह
आज
आज मानसन्मान, प्रसिद्धी मिळण्याची शक्यता. नेतृत्वगुण दिसून येतील. मात्र अहंकार टाळा. आत्मविश्वास वाढवणारा दिवस.

कन्या
आज
कामात अचूकता आणि मेहनत लागेल. बुध–मंगळ योगामुळे कामाचा ताण वाढेल. आरोग्याकडे लक्ष द्या.संध्याकाळ खर्चिक.एखादी छान बातमी मिळेल.

तुळ
आज
नातेसंबंधात स्पष्ट संवाद होईल. दुपारनंतर जबाबदाऱ्या वाढतील. आज समतोल साधण्याचा दिवस.वाहन सौख्य लाभेल.

वृश्चिक
आज
चंद्र–मंगळ युतीमुळे रागावर नियंत्रण ठेवा. ध्यान, जप उपयोगी ठरेल.इलेक्ट्रॉनिक वस्तू ची काळजी घ्या.

धनू
आज
सकाळपर्यंत चंद्र तुमच्याच राशीत आणि दुपारनंतर धनस्थानी असेल.आत्मविश्वास आणि उत्साह जास्त.अनपेक्षित लाभ,प्रवास होतील.लक्ष्मी प्राप्ती चे योग. संध्याकाळनंतर कामावर लक्ष केंद्रित करावे लागेल.

मकर
आज
दुपारी ४:४१ नंतर चंद्र तुमच्याच राशीमध्ये येईल.जबाबदारी, शिस्त आणि करिअरवर लक्ष वाढेल. महिलांसाठी कामात प्रगतीचा संकेत.अडचणी दूर होतील.

कुंभ
आज
चंद्र त्रिकोण हर्शलमुळे अचानक संधी, नवीन कल्पना मिळतील. सर्जनशील महिलांसाठी उत्तम दिवस.

मीन
आज चंद्राचा
नेपच्यून लाभ योगामुळे अंतर्ज्ञान वाढेल. अध्यात्म, ध्यान, संगीत याकडे ओढ राहील. भावनिक निर्णय टाळा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *