सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. शिशिर
🚩 उत्तरायण 🌕 पौष कृष्ण त्रयोदशी/ महादेव गोविंद रानडे पुण्यतिथी / धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन
🌸 नक्षत्र…. मूळ
🌸 वार…. शुक्रवार
🌼 दिनांक….. १६ जानेवारी २०२६
🌚 राहुकाल… दुपारी १२/०० ते ०१/३०
🌞 आजचा दिवस चांगला
🌞 सुर्योदय ०७/१० मि.
🌘 सुर्यास्त ०५/५५ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩
🚩 शुभभवंतु 🚩
‼️ दैनिक राशी भविष्य ‼️
‼️ दिनांक १६ जानेवारी २०२६‼️
मेष
आज
आज मन थोडं अस्वस्थ राहील. घरातील कामे, जबाबदाऱ्या वाढतील. कोणावर तरी राग काढण्याऐवजी शांतपणे बोला. आरोग्याची थोडी काळजी घ्या.
वृषभ
आज
नातेसंबंधांमध्ये गैरसमज होऊ शकतात. पती/जोडीदाराशी संवाद महत्त्वाचा. आर्थिक बाबतीत खर्चावर नियंत्रण ठेवा.
मिथुन
आज
कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढेल. मनात अनेक विचार येतील पण योग्य निर्णय घ्याल. भावंडांकडून मदत मिळेल.
कर्क
आज
भावनिक चढउतार जास्त असतील. जुन्या आठवणी मनात येतील. मातृसुख, घरातील वातावरण यावर लक्ष द्या.
सिंह
आज
आज आत्मसन्मान आणि अहंकार यामध्ये संघर्ष होऊ शकतो. संयम ठेवल्यास परिस्थिती तुमच्या बाजूने वळेल. स्वतःची काळजी घेणे आवश्यक.
कन्या
आज
चंद्र तुमच्या राशीत असल्याने मन फार संवेदनशील राहील. छोट्या गोष्टींचा जास्त विचार होईल. स्वतःला दोष देणे टाळा.
तुळ
आज
नात्यांमध्ये समतोल साधण्याची गरज आहे. सासरकडील किंवा माहेरकडील विषय पुढे येऊ शकतात. शांत राहिल्यास सगळं नीट होईल.
वृश्चिक
आज
बोलताना सावध राहा. रागाच्या भरात बोललेले शब्द नंतर त्रास देतील. आरोग्य व झोपेची काळजी घ्या.
धनु
आज
मंगळ–गुरू प्रतियुतीमुळे घाईघाईने निर्णय होऊ शकतो. संयम ठेवा. आज आर्थिक नियोजनाचा दिवस.
मकर
आज
कुटुंबातील जबाबदाऱ्या वाढतील. कामाचा ताण जाणवेल पण तुमचं कर्तव्यभावना तुम्हाला सावरून धरतील.
कुंभ
आज
मित्रमैत्रिणी, ओळखीतुन मदत मिळेल. मनात नवे विचार येतील. लेखन, कला, संवादासाठी चांगला दिवस.
मीन
आज
नात्यांमध्ये अपेक्षा जास्त ठेवू नका. भावना समजून घ्या पण स्वतःला विसरू नका. अध्यात्माकडे ओढ वाढेल.












Leave a Reply