बीड -बीडचे आ संदीप क्षीरसागर यांच्या गटाने अजित पवार गटाचे उमेदवार विनोद मुळूक यांना नगर परिषद उपाध्यक्ष पदासाठी बिनविरोध पाठिंबा दिला. त्यामुळे मुळूक यांची उपाध्यक्ष पदी निवड झाली. क्षीरसागर मुक्तीचा नारा देणाऱ्या पंडिताना शेवटी एका क्षीरसागर ची मदत घ्यावीच लागल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.
बीड नगर परिषद निवडणुकीत अजित पवार गटाचा नगराध्यक्ष आणि 19 नगरसेवक निवडून आले होते. शिवसेनेचे तीन नगरसेवक आणि काँग्रेस, एमआयएम ने पाठिंबा दिल्याने त्यांची संख्या 25 झाली होती. मात्र बहुमतासाठी आ संदीप क्षीरसागर यांची मदत आवश्यक होती.
आ क्षीरसागर कोणाला पाठिंबा देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. निवडणूक निकालानंतर आ विजयसिंह पंडित यांनी बीड क्षीरसागर मुक्त झाल्याची प्रतिक्रिया दिली होती. मात्र उपाध्यक्ष पदासाठी त्यांना आ संदीप क्षीरसागर यांचा पाठिंबा घ्यावा लागला आहे.
आ संदीप क्षीरसागर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा झाल्यानंतर बीडमध्ये पाठिंब्याचे पत्र दिले. भाजपकडून डॉ सारिका क्षीरसागर यांनी अर्ज दाखल केला होता.
उपाध्यक्ष निवडीची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस चे मताधिक्य अधिक असल्याने उपाध्यक्ष म्हणून विनोद मुळूक यांची निवड झाली.












Leave a Reply