सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. शिशिर
🚩 उत्तरायण 🌕 पौष कृष्ण द्वादशी/करीदिन
🌸 नक्षत्र…. ज्येष्ठा
🌸 वार…. गुरुवार
🌼 दिनांक….. १५ जानेवारी २०२६
🌚 राहुकाल… दुपारी ०१/३० ते ०३/००
🌞 आजचा दिवस चांगला
🌞 सुर्योदय ०७/१० मि.
🌘 सुर्यास्त ०६/०५ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩
🚩 शुभभवंतु 🚩
‼️ दैनिक राशी भविष्य ‼️
‼️ दिनांक १५ जानेवारी २०२६‼️
मेष: तुमचा स्वभाव स्पष्ट वक्ता आहे. आपल्या कामाशी काम असावे असे तुम्हाला वाटते. आज व्यावसायिक यश मिळवाल. तुमचा तणाव कमी होण्यासाठी ध्यान प्राणायाम करा.
वृषभ: आज आवडत्या छंदाला वेळ द्याल. त्यातून अर्थलाभ देखील होईल. मित्र सहकारी यांचे सहकार्य लाभेल. आध्यात्मिक उपासना घडेल.
मिथुन: आपल्या उत्तम वक्तृत्वाचा उपयोग करा, त्यास कलेची जोड द्या. घरात देखील आज तुमचे कौतुक होईल. कौटुंबिक जीवन चांगले राहील. आर्थिक नियोजन करावे.
कर्क: चर्चा संवाद साधण्यासाठी चांगला दिवस आहे. आज तुमच्या गुणांचा सन्मान होईल. बुद्धीचातुर्य चमकेल. आर्थिक आवक चांगली असणार आहे. मात्र एखादे धार्मिक कार्य अपुरे राहू शकते.
सिंह: संयमाने काम करावे. महत्वाचे निर्णय शक्यतो लांबणीवर टाकावेत. योग्य सल्ला घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नका. उपासना करावी.
कन्या: अनुकूल दिवस आहे. व्यवसायात चांगली वाढ होईल. मित्र मंडळी पासून लाभ होतील. संशोधन क्षेत्रात कामगिरी कराल. कौटुंबिक पाठींबा लाभेल.
तुळ: कामानिमित्त धावपळ होऊ शकते. धार्मिक कार्य पूर्ण करा. नियमित कामात काही बदल घडेल. सकारात्मक विचार करा. यश लाभेल.
वृश्चिक: संवादाने अपेक्षेनुसार कामे पूर्ण होतील. आज धर्म कार्य कराल. प्रवास घडतील. कौटुंबिक जीवन चांगले राहील. मित्र परिवारातून लाभ होईल.
धनु: नियोजित कामावर लक्ष केंद्रित करा. अधिकार व जबाबदारी वाढेल. प्रसंगी कठोर भूमिका घ्यावी लागेल. कमी बोलणे हिताचे आहे. आर्थिक कामे होतील.
मकर: महत्वाची कामे होतील. चांगला दिवस आहे. आर्थिक दृष्टीने चांगला कालावधी आहे. तुम्ही केलेले धार्मिक कृत्य आणि दानधर्म यांचा नक्कीच लाभ होणार आहे. जोडीदाराची चांगली साथ लाभणार आहे.
कुंभ: अनुकूल दिवस आहे. कामानिमित्त प्रवास करावा लागेल. मौल्यवान वस्तू मिळतील. संगणक क्षेत्रात यश मिळेल. कोणत्याही कामामध्ये लक्षपूर्वक कृती करा. चुकीचे मार्गदर्शन मिळू शकते.
मीन: व्यावसायिक प्रगती साधेल. नियोजित कार्य वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. संतती कडून चांगली बातमी समजेल. कार्यासंबंधित लोकांना विश्वासात घ्या.












Leave a Reply