News & View

ताज्या घडामोडी

images 2020 07 11T085039.947

आजचे राशीभविष्य!


 सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग 
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. शिशिर
🚩 उत्तरायण 🌕 पौष कृष्ण षटशीला एकादशी / मकर संक्रांत / संक्रमण पुण्यकाळ दुपारी ०३/०६ ते सायं. ०६/१९
🌸 नक्षत्र…. अनुराधा
🌸 वार…. बुधवार
🌼 दिनांक….. १४ जानेवारी २०२६
🌚 राहुकाल… दुपारी १२/०० ते ०१/३०
🌞 आजचा दिवस शुभ
🌞 सुर्योदय ०७/१० मि.
🌘 सुर्यास्त ०५/५५ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩

🚩 शुभभवंतु  ‼

️ दैनिक राशी भविष्य ‼️
‼️ दिनांक १४ जानेवारी २०२६‼️

मेष
आज चतुर्थ स्थानी चन्द्र आहे.
आज मन चंचल राहील. घरातील जबाबदाऱ्या आणि बाहेरील कामे यामध्ये ओढाताण जाणवेल. आई किंवा मोठ्या स्त्री व्यक्तीशी मतभेद टाळा. थोडी विश्रांती घेतल्यास मन स्थिर राहील.

वृषभ
आज तृतीय स्थानी चन्द्र आहे.
आज बोलण्यातून नाती जपली जातील किंवा बिघडू शकतात. त्यामुळे शब्द जपून वापरा. मित्र मैत्रिणीशी मनमोकळा संवाद तुम्हाला हलके करेल. छोटा प्रवास संभवतो.

मिथुन
आज धन स्थानी चन्द्र आहे.
आज आर्थिक बाबी मनात असतील. घरखर्च किंवा मुलांवरील खर्च वाढू शकतो. भावनिक निर्णय टाळा. स्वतःच्या कुवतीवर विश्वास ठेवा.

कर्क
आज चंद्र तुमच्या राशीत असल्याने भावना तीव्र असतील. इतरांकडून अपेक्षा वाढतील पण त्या पूर्ण न झाल्यास निराशा येऊ शकते. स्वतःवर प्रेम करा, स्वतःची काळजी घ्या.

सिंह
आज व्यय स्थानी चन्द्र आहे.
आज एकांताची गरज भासेल. जुने विचार, आठवणी मनात येतील. स्वतःला दोष देऊ नका. ध्यान, प्रार्थना ,प्राणायाम केल्यास मन शांत होईल.

कन्या
आज लाभ स्थानी चन्द्र आहे.
आज मैत्री आणि सामाजिक संबंध महत्त्वाचे असतील. एखाद्या मित्रमैत्रिणीकडून अपेक्षा पूर्ण न झाल्याने मन खट्टू होईल. संयम ठेवल्यास नातं टिकेल.

तुळ
आज दशम स्थानी चन्द्र आहे.
काम आणि घर यांचा ताण जाणवेल. वरिष्ठ व्यक्ती शी किंवा घरच्यांशी मतभेद होऊ शकतात. शांतपणे ऐकून घ्या, उत्तर उशिरा द्या.

वृश्चिक
आज भाग्य स्थानी चन्द्र आहे.
आज अंतर्मन संवेदनशील असेल. अध्यात्मिक गोष्टींकडे ओढ वाढेल. दूरच्या नात्यातील स्त्री व्यक्तीकडून आधार मिळेल.

धनु
आज अष्टमात स्थानी चन्द्र आहे.
नातेसंबंधात विश्वासाचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. मनातील गोष्टी लगेच व्यक्त करू नका. आर्थिक व्यवहार सावधपणे करा.वाहन काळजीपूर्वक चालवा.

मकर
आज सप्तम स्थानी चन्द्र आहे.
जोडीदाराशी किंवा घरातील व्यक्तीशी मतभेद संभवतात. अहंकार टाळा. समजून घेतल्यास नातं मजबूत होईल.

कुंभ

आज षष्ठ स्थानी चन्द्र आहे.
आरोग्याकडे लक्ष द्या. थकवा, डोकेदुखी जाणवू शकते. स्वतःवर ताण घेऊ नका. कुटुंबाकडून कडून सहकार्य मिळेल.

मीन

आज पंचम स्थानी चन्द्र आहे.
आज प्रेम आणि भावना यांचा सुंदर संगम आहे. कला, छंद यामध्ये मन रमेल. मुलांकडून आनंद मिळेल.छान बातमी मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *