News & View

ताज्या घडामोडी

images 2020 07 11T085039.947

आजचे राशीभविष्य!


 सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग 
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. शिशिर
🚩 उत्तरायण 🌕 पौष कृष्ण दशमी / भोगी
🌸 नक्षत्र…. विशाखा
🌸 वार…. मंगळवार
🌼 दिनांक….. १३ जानेवारी २०२६
🌚 राहुकाल… दुपारी ०३/०० ते ०४/३०
🌞 आजचा दिवस शुभ
🌞 सुर्योदय ०७/१० मि.
🌘 सुर्यास्त ०५/५५ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩

🚩 शुभभवंतु 🚩

‼️दैनिक राशी भविष्य ‼️
‼️ दिनांक १२ जानेवारी २०२६‼️

मेष
आज
सकाळी कामांची धावपळ असेल, पण दुपारनंतर घराकडे लक्ष जाईल. घरच्यांसाठी काहीतरी खास करावंसं वाटेल. मनात न सांगितलेल्या भावना असतील, त्या हळूच व्यक्त करा. स्वतःवर थोडं प्रेम करा.

वृषभ
आज
मन थोडं हळवं राहील. कोणाच्या शब्दांनी पटकन मन दुखू शकतं, त्यामुळे जास्त विचार न करता शांत राहा. , घर सजावट किंवा एखादं आवडीचं काम केल्याने मन प्रसन्न होईल.

मिथुन
आज
सकाळपर्यंत आत्मविश्वास चांगला राहील. बोलण्यात सहजता असेल. दुपारनंतर मात्र भावना वरचढ होतील. सगळ्यांसाठी सगळं करण्यापेक्षा आज स्वतःसाठी थोडा वेळ काढणं गरजेचं आहे.

कर्क
आज
चंद्र तुमच्याच राशीत येतोय, त्यामुळे मन जरा जास्त संवेदनशील राहील. घर, मुलं, आईवडील यांची काळजी घेण्यात दिवस जाईल. जुन्या आठवणी डोळ्यासमोर येतील, थोडं भावुक व्हाल, पण तेही ठीक आहे.

सिंह
आज
जरा शांत राहावंसं वाटेल. सगळ्यांशी बोलण्यापेक्षा मनातल्या गोष्टी स्वतःशीच बोलाव्याशा वाटतील. एकट चहा घेत बसणं, पुस्तक वाचणं किंवा शांत संगीत ऐकणं मनाला सावरून धरतील.

कन्या
आज
मित्रमैत्रिणींचा सहवास मिळेल किंवा फोनवर मनमोकळ्या गप्पा होतील. कोणीतरी तुमचं ऐकून घेईल, समजून घेईल. घर आणि बाहेरचं सगळं नीट सांभाळण्याची तुमची ताकद आज पुन्हा लक्षात येईल.

तुळ
आज
जबाबदाऱ्या थोड्या जास्त वाढतील, पण त्यातून समाधानही मिळेल. घरातली मोठी व्यक्ती तुमच्यावर विश्वास दाखवेल. स्वतःवर शंका नका घेऊ, तुम्ही खूप काही करत आहात.

वृश्चिक
आज
मनन कराल . “मला काय हवंय?” हा प्रश्न मनात येईल. प्रार्थना, ध्यान किंवा शांत बसणं मनाला आधार देईल. सगळं मनात ठेवण्यापेक्षा कुणाशी तरी बोलणं चांगलं.

धनु
आज
दुपारनंतर भावना चढउतार दाखवतील. एखादी जुनी गोष्ट आठवून मन जड होऊ शकतं. पण आज सोडून देण्याचा, स्वतःला हलकं करण्याचा दिवस आहे. स्वतःला दोष देऊ नका.

मकर
आज
नात्यांमध्ये समजून घेण्याची गरज आहे. जोडीदार, घरातील व्यक्तींशी मोकळेपणाने बोलल्यास मन हलकं होईल. आज सहकार्याची गरज भासेल आणि ते मिळेलही.

कुंभ
आज
घरकाम, आरोग्य आणि रोजच्या गोष्टी याकडे लक्ष द्यावं लागेल. अचानक काही बदल होतील, पण तुम्ही सगळं नीट हाताळाल. थकवा जाणवेल, म्हणून स्वतःची काळजी घ्या.

मीन
आज
आज मन खूप हळवं आणि प्रेमळ असेल. मुलं, छंद, कला यामध्ये आनंद मिळेल. कुणासाठी तरी काहीतरी खास करावंसं वाटेल. आजचा दिवस मनाला समाधान देणारा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *