News & View

ताज्या घडामोडी

images 2020 07 11T085039.947

आजचे राशीभविष्य!


 सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग 
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. शिशिर
🚩 उत्तरायण 🌕 पौष कृष्ण पंचमी
🌸 नक्षत्र…. मघा
🌸 वार…. बुधवार
🌼 दिनांक….. ०७ जानेवारी २०२६
🌚 राहुकाल… दुपारी १२/०० ते ०१/३०
🌞 आजचा दिवस शुभ
🌞 सुर्योदय ०७/०५ मि.
🌘 सुर्यास्त ०५/४५ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩

🚩 शुभभवंतु 🚩

‼️ दैनिक राशी भविष्य ‼️
‼️ दिनांक ०७ जानेवारी २०२६‼️

मेष : चांगला दिवस आहे. नियोजित दैनंदिनी कामामध्ये यश मिळेल. बोलताना मतभेद होणार नाहीत याची काळजी घ्यावी. आर्थिक लाभ होतील.

वृषभ: आत्मविश्वासपूर्वक कार्य कराल, त्यामुळे कामांना गती मिळेल. कौटुंबिक मतभेद निवारण होऊन आनंदी दिवस असेल.

मिथुन : कामामध्ये विशेष लक्ष देणे अवश्यक आहे. व्यवहारातील कागदपत्रे तपासा. अध्यात्मिक धार्मिक वाचन मनन लाभदायक ठरेल.

कर्क : प्रतिष्ठा वाढेल मित्रपरिवारातून सहकार्य मिळेल. उत्पन्नाचे नवीन मार्ग सापडतील. नियोजनाप्रमाणे कार्य संपादन होण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.

सिंह : जबाबदारी वाढल्याने कामात थोडा तणाव वाढेल. वरिष्ठांशी मतभेद टाळा. सहकार्याने काम करा. आर्थिक काम होईल.

कन्या : नविन कल्पना सुचतील. कुटुंबाच्या सहकार्याने आमलात आणाल. प्रवासाचे योग आहेत. विद्यार्थ्यांसाठी प्रगतीदायक दिवस आहे.

तुळ :अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवणे अवश्यक आहे. व्यवहारात सावधगिरी आवश्यक आहे. मनातून सकारात्मक राहा व स्वतःच्या कामामध्ये लक्ष घाला. यश मिळेल.

वृश्चिक : नातेवाईक भागीदार यांच्या सहकार्याने व्यवहारात यश मिळेल. जोडीदाराकडून सहकार्य लाभेल. पाहूणे येण्याची शक्यता आहे. संवादातून संबंध चांगले दृढ होतील.

धनु : जबाबदारी वाढेल त्यामुळे कामाचा ताण जाणवेल. आरोग्यविषयक काळजी घ्या. नकारात्मक विचारांपासून दूर राहा. काही मतभेद झाले तरी आनंदी दिवस असेल.

मकर :- उत्तम दिवस. कलाकौशल्यातून प्रतिष्ठा मिळवाल. मित्र संगतीकडून लाभ होण्याची शक्यता आहे. परिवारीक जीवन आनंदी उत्साही राहील.

कुंभ : मनाची चलबिचल असेल थोडी अस्वस्थता जाणवेल. प्राणायाम ध्यानधारणा लाभदायक होईल. सकारात्मक विचार वाढवा. प्रगती साधता येईल.

मीन : चांगला दिवस आहे. नविन मित्र मिळतील. संवादातून कामामध्ये चांगली प्रगती साधाल. आर्थिक कामे होण्यासाठी थोडे प्रयत्न करावे लागतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *