बीड -नगर पालिका निवडणुकीत अपेक्षित यश मिळाले नसले तरी किंगमेकर च्या भूमिकेत असणारे शरद पवार गटाचे बीडचे आहे संदीप क्षीरसागर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांची शुक्रवारी भेट घेतली. पवार आणि क्षीरसागर यांच्या या भेटीत काय गुप्त खलबत झाली यावरून तर्क वितर्क लावले जातं आहेत. यावेळी माजी आ सय्यद सलीम उपस्थित होते.
बीड नगरपालिका निवडणुकीचा निकाल लागून बारा दिवसांचा कालावधी उलटला आहे या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा नगराध्यक्ष आणि 19 नगरसेवक विजयी झाले आहेत अजित पवार गटाकडे संपूर्ण बहुमत नसले तरी त्यांच्या नगराध्यक्षांनी शुक्रवारी सकाळी पदभार घेतला.
दरम्यान गुरुवारी बीडमध्ये विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या व्यासपीठावर उपस्थित असणारे शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर हे शुक्रवारी अचानक अजित पवारांच्या भेटीसाठी त्यांच्या जिजाई या निवासस्थानी दाखल झाले त्यांच्यासोबत माजी आमदार सय्यद सलीम हे देखील उपस्थित होते.
बीड मधील राजकीय परिस्थिती पाहता संदीप क्षीरसागर हे भाजपसोबत जाणार की अजित पवार यांच्यासोबत अशी चर्चा सुरू आहे त्यांचे बंधू योगेश क्षीरसागर यांच्या पत्नी सारिका शिरसागर यांनी निवडणूक निकालानंतर क्षीरसागर मुक्त बीड झालेले नाही आणि शक्य नाही असे म्हणत आमचे दीर यांचेही 12 पेक्षा अधिक नगरसेवक निवडून आलेत असं सांगत क्षीरसागर एकत्रीकरणाबाबत सूचित केले होते.
त्यामुळे संदीप क्षीरसागर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. या दरम्यान आ क्षीरसागर हे अजित दादांच्या भेटीला गेल्याने आणि दादांनी देखील त्यांना वेळ देऊन चर्चा केल्याने राजकीय वातावरण गरम झाले आहे.












Leave a Reply