News & View

ताज्या घडामोडी

images 2020 07 11T085039.947

आजचे राशीभविष्य!


 सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग 
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. हेमंत
🚩 दक्षिणायन 🌕 मार्गशीर्ष कृष्ण तृतीया / संकष्टी चतुर्थी चंद्रोदय ०८/३४ मि.
🌸 नक्षत्र…. पुनर्वसू
🌸 वार…. रविवार
🌼 दिनांक….. ०७ डिसेंबर २०२५
🌚 राहुकाल… सायंकाळी ०४/३० ते ०६/००
🌞 आजचा दिवस चांगला
🌞 सुर्योदय ०६/४९ मि.
🌘 सुर्यास्त ०५/४० मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩

🚩 शुभभवंतु 🚩

‼️ दैनिक राशी भविष्य ‼️
‼️ दिनांक ०७ डिसेंबर २०२५ ‼️

मेष
आज
आत्मविश्वास वाढेल काही अचानक निर्णय घ्यावे लागतील. द्विधा मनस्थिती टाळा. कामात प्रगती.आजचा दिवस ऊर्जेने भरलेला असून निर्णयक्षमता तीक्ष्ण राहील. चंद्र-हर्षल युतीमुळे काही अचानक बदल, नवी कल्पना किंवा अनपेक्षित बातमी मिळू शकते. चंद्र-बुध प्रतियुतीमुळे बोलण्यात किंवा संवादात थोडी घाई-गडबड होण्याची शक्यता.

वृषभ
आज
आज अचानक खर्च किंवा बदलाची बातमी मिळू शकते. शांत राहून दिवस सांभाळा. संध्याकाळनंतर परिस्थिती स्थिर होईल. आरोग्याकडे लक्ष द्या.

मिथुन
आज लाभ स्थानी चन्द्र आहे.
गतीमान दिवस. मित्रांकडून किंवा सहकार्यांकडून अचानक मदत मिळू शकते. मात्र संवादात गैरसमज होऊ नये याची दक्षता घ्या.शैक्षणिक यश लाभेल.

कर्क
आज
नोकरीत नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. वरीष्ठांकडून मिश्र प्रतिसाद. घरगुती गोष्टीत ताण जाणवेल पण गुरू-शनी लाभामुळे शेवट सकारात्मक.

सिंह
आज
नवीन कल्पना सुचतील. प्रवास किंवा कामात उत्साह. परंतु बोलण्यातील तिखटपणा टाळा; अन्यथा गैरसमज होऊ शकतो.

कन्या
आज
आर्थिक बाबतीत सावधगिरी. चंद्र-बुध प्रतियुतीमुळे टेन्शन वाढू शकते. संध्याकाळनंतर आर्थिक लाभ किंवा महत्वाचा निर्णय पक्का होईल.

तुळ
आज
नातेसंबंधात अचानक चर्चा किंवा वादाची शक्यता. शांत संवाद ठेवा. कामात स्थैर्य मिळेल. जोडीदाराचे मत समजून घ्या.

वृश्चिक
आज
आरोग्याकडे लक्ष. कामाचा ताण वाढू शकतो. मात्र हर्षल योगामुळे अचानक उपाय, मदत किंवा नवी संधी निर्माण होईल.

धनू
आज
आज आनंदाचा दिवस. अचानक एखादी चांगली बातमी मिळू शकते. प्रेमसंबंधात पुढाकार. सर्जनशीलतेत वाढ.

मकर
आज
घरगुती वातावरणात काहीतरी अचानक बदल. भावनेपेक्षा तर्काला महत्त्व द्या. संध्याकाळी शांतता व समाधान मिळेल.

कुंभ
आज
आज विचारांचा वेग जास्त. कामात स्फूर्ती येईल. नवीन कल्पना सुचतील. मात्र घाईत निर्णय घेऊ नका. बोलण्यात सावधगिरी बाळगा.

मीन
आज
आर्थिक बाबतीत चांगले संकेत. अचानक उत्पन्न वाढण्याची किंवा लाभाची शक्यता. मात्र खरेदीत जरा संयम ठेवा. मन प्रसन्न राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *