बीड- पक्षाघातामुळे आजारी असलेल्या अन मेडिकल बोर्डाने अनफिट केलेल्या शिक्षकाला परत सेवेत घेण्याचा कुटाना शिक्षण विभागातील दोन कर्मचाऱ्यांच्या चांगलाच अंगलट आला आहे.कनिष्ठ लिपिक गोसावी यांना निलंबित तर कनिष्ठ प्रशासन अधिकारी नायगावकर यांची एक वेतनवाढ रोखण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी दिले आहेत.यामध्ये शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांनी देखील डोळेझाक केल्याने सीईओ पवार यांनी त्यांना झाप झाप झापले आहे.
बीड जिल्हा परिषदेच्या केज तालुक्यातील शाळेवर शिक्षक असलेले राठोड यांना मागील वर्षी पक्षाघाताचा (पॅरॅलीस) आजार झाला.वर्षभर उपचार घेतल्यानंतर ते ऑक्टोबर 2022 मध्ये सेवेत रुजू होण्यासाठी आले,तेव्हा सीईओ यांनी त्यांचे फिटनेस प्रमाणपत्र मागवले.मक्तर मेडिकल बोर्डाने त्यांना अनफिट जाहीर केले.
त्यानंतर राठोड यांना रुग्णता सेवानिवृत्ती देऊन त्यांच्या रजेच्या काळातील पगार काढण्याचे आदेश सीईओ पवार यांनी काढले.हे आदेश लागू करण्याऐवजी जिखा परिषद शिक्षण विभागातील कनिष्ठ लिपिक जे जे गीसावी मॅडम यांनी आणि कनिष्ठ प्रशासन अधिकारी माधव नायगावकर यांनी शिक्षणाधिकारी श्रीकांत कुलकर्णी यांच्याशी संगनमत करून राठोड यांना परत मेडिकल बोर्डाकडे पाठवले.वास्तविक पाहता हे करताच येतं नाही अन करायचे असेल तर सीईओ यांची परवानगी घ्यावी लागते. मात्र चार दोन रुपये पदरात पडणार म्हणून कुलकर्णी, नायगावकर आणि गोसावी यांनी बेकायदेशीर पणे हा कुटाना केला.
मेडिकल बोर्डाने राठोड यांना एक वर्षासाठी फिट केले,त्यानंतर त्यांच्या रजेच्या पगाराची फाईल पुन्हा सीईओ कडे गेली.ज्या कर्मचाऱ्याला रुग्णता सेवानिवृत्ती द्यावी असे आदेश आपण दिलेत त्याला पुन्हा सेवेत घेऊन रजेचा पगार काढण्याची फाईल आल्याने सीईओ पवार हे देखील आश्चर्यचकित झाले.
त्यांनी या सर्व प्रकरणाची माहिती घेतली तेव्हा गोसावी मॅडम आणि नायगावकर हे दोघे दोषी असल्याचे आढळून आले. तेव्हा गोसावी यांना तडकाफडकी निलंबित करत नायगावकर यांची एक वेतनवाढ रोखण्याचे आदेश सीईओ यांनी दिले.
या सगळ्या प्रकरणात शिक्षणाधिकारी कुलकर्णी यांनी अक्षम्य डोळेझाक केली.एखाद्या कर्मचाऱ्याला रुग्णता सेवानिवृत्त करण्याचे आदेश झाल्यावर पुन्हा त्याला सेवेत घेणे चुकीचे आहे. मात्र कुलकर्णी यांनी हाताखालच्या कर्मचाऱ्यांच्या म्हणण्यावर हा सगळा प्रकार केल्याने सीईओ पवार यांनी त्यांची चांगलीच खरडपट्टी काढली.
Leave a Reply