News & View

ताज्या घडामोडी

240 172269472266ae3c42b28b6 ee6111a4193fb522e1393178cdd10a9e

शिंदे, फुलारी सस्पेंड!

बीडबीड जिल्हा परिषदेचे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भगवान फुलारी आणि माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे यांचे निलंबन करण्यात आले आहे.

बीड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक विभागात गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात गैरकारभार झाला आहे. शिक्षकांची बोगस भरती असो कि नव्याने नियुक्ती अथवा बदली या सगळ्या प्रकरणात मोठ्या प्रमाणात नागनाथ शिंदे आणि भगवान फुलारी यांनी गैरकारभार केल्याच्या तक्रारी झाल्या होत्या.

इंजिनियर सादेक इनामदार यांनी फुलारी आणि शिंदे यांनी केलेल्या गैरकारभाराबाबत मंत्रलयीन स्तरावर तक्रारी केल्या होत्या. त्याची दखल घेत शासनाने या दोघांना निलंबित केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *