News & View

ताज्या घडामोडी

images 2020 07 11T085039.947

आजचे राशीभविष्य!


 सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग 
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. हेमंत
🚩 दक्षिणायन 🌕 कार्तिक शुक्ल सप्तमी
🌸 नक्षत्र…. पुष्य
🌸 वार… मंगळवार
🌼 दिनांक….. ११ नोव्हेंबर २०२५
🌚 राहुकाल… दुपारी ०३/०० ते ०४/३०
🌞 आजचा दिवस चांगला
🌞 सुर्योदय ०६/३२ मि.
🌘 सुर्यास्त ०५/४५ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩

🚩 शुभभवंतु 🚩

‼️दैनिक राशी भविष्य ‼️
दिनांक ११ नोव्हेंबर २०२५

मेष:- आज छान दिवस आहे.वाहन सौख्याचा दिवस. छोटे प्रवास घडतील.भावंडकडून लाभ होतील.घरगूती कामात व्यस्त रहाल.कलाकारांना छान.

वृषभ:- आज कौटुंबिक समारंभात सहभागी व्हाल.आवडत्या पदार्थांचा आस्वाद घ्याल.आर्थिक लाभ होतील.

मिथुन:- आज मन उत्साही व आनंदी राहील.स्वतःच्या आनंदासाठी वेळ द्याल.इतरांवर प्रभाव राहील.

कर्क:- आज धार्मिक कामांसाठी वेळ द्याल.प्रिय व्यक्ती सोबत मस्त शॉपिंग कराल.दागिने खरेदी ची शक्यता.

सिंह:- आज मैत्र मंडळी सोबत भेटीगाठी होतील.एखाद्या समारंभात भाग घ्याल.विवाह इच्छुकांना खूष खबर मिळु शकते.घरातल्या सजावटी वर खर्च कराल.

कन्या:- आज तुम्ही केलेल्या कामाचे कौतुक होईल.कामानिमित्त प्रवास घडेल.मन आनंदी राहील.विवाह इच्छुक तरुणींना मनपसंत जोडीदाराशी भेट घडू शकते.

तुळ:- आज छान दिवस आहे.भाग्यवर्धक घटना घडतील.पतीची साथ लाभेल.धार्मिक कार्य घडेल.तीर्थयात्रा घडू शकतात.

वृश्चिक:- आज कामाचा थकवा जाणवेल.वाहन जपून चालवा.दुखणी अंगावर काढू नका,योग्य सल्ला घ्या.

धनु:- आज अनुकूल दिवस.जोडीदाराकडून आनंददायी बातमी मिळेल.पतीकडून भेटवस्तू मिळू शकते.

मकर:- आज महत्वाची कामे होतील.नवीन नोकरी इच्छुकांना खूष खबर मिळेल.सामजिक कार्यात भाग घ्याल.दगदग टाळा.

कुंभ:- आज अनुकूल दिवस आहे.संतती कडून सुखदायी बातमी मिळू शकते. एखादे बक्षिस, शाबासकी ची थाप मिळेल. मेहनतीच्या मनाने उत्तम यश मिळेल.

मीन:- आज राहत्या वास्तू चे प्रश्न मार्गी लागतील.एखाद्या समारंभात भाग घ्याल.वाहन सौख्य लाभेल.घरकामासाठी वेळ द्याल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *