News & View

ताज्या घडामोडी

india women vs south africa women weather update

अभिमानास्पद,भारत विश्व चॅम्पियन!

पुणे -महिलांच्या एकदिवसीय क्रिकेट विश्व चषक स्पर्धेत भारतीय महिलांनी दक्षिण आफ्रिकेचा दणदणीत पराभव करत विश्व चषकावर आपले नाव कोरले.भारतीय महिलांनी दाखवलेल्या जिगरबाज खेळीमुळे देशाची मान उंचावली आहे.

नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियममध्ये होत असलेला फायनल सामना पावसामुळे २ तास उशिराने सुरू झाला. त्यानंतर भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत ५० षटकांत ७ बाद २९८ धावा केल्या आहेत. यासह दक्षिण आफ्रिकेला फायनलमध्ये विजयासाठी २९९ धावांचं आव्हान दिलं आहे.

भारताकडून सलामीवीर शफाली वर्मा व स्मृती मानधना यांनी १०४ धावांची भागीदारी रचत संघाला कमालीची सुरूवात करून दिली. पण नंतर दक्षिण आफ्रिकेने पुनरागमन करत भारताच्या धावांना ब्रेक लावला आणि लागोपाठ विकेट्स पटकावले. यामुळे भारतीय संघ ३०० पार धावसंख्या गाठू शकला नाही. आफ्रिकेकडून आयागोंका खाकाने ३ विकेट्स घेतल्या, तर गोलंदाजांनी तिला चांगली साथ दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *