News & View

ताज्या घडामोडी

images 2020 07 11T085039.947

आजचे राशीभविष्य!


 सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग 
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. हेमंत
🚩 दक्षिणायन 🌕 कार्तिक शुक़्ल दशमी/ प्रबोधिनी स्मार्त एकादशी
🌸 नक्षत्र…. शततारका
🌸 वार… शनिवार
🌼 दिनांक….. ०१ नोव्हेंबर २०२५
🌚 राहुकाल… सकाळी ०९/०० ते १०/३०
🌞 आजचा दिवस उत्तम
🌞 सुर्योदय ०६/३२ मि.
🌘 सुर्यास्त ०५/५७ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩

🚩 शुभभवंतु 🚩
‼️दैनिक राशी भविष्य ‼️
दिनांक ०१ नोव्हेंबर २०२५

मेष – जास्त कार्यभार आपल्या मानसिक व्यग्रतेचे आणि ताणाचे कारण बनू शकते. प्रवास कार्यसाधक घडतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

वृषभ – आजचा दिवस उत्तम आहे. आपण इतर लोकांना मार्गदर्शन करू शकता. एखादी चांगली संधी मिळाल्यामुळे आपली मनस्थिती चांगली राहील.

मिथुन – आपले कौशल्य उत्तम राहील. मित्रांबरोबर आणि इतर लोकांबरोबर काळ व्यतीत करण्याची आज आकस्मिक संधी मिळेल.

कर्क – गंभीरपणे विचार केलात तर एखादी बौद्धिक योजना आरंभ करू शकाल. आपल्या जोडीदाराबरोबर उत्तम वेळ व्यतीत कराल पण घरगुती मुद्दे आपले लक्ष विचलीत करतील.

सिंह – आनंदाची बातमी मिळेल. राजकीय विषयांमध्ये यश मिळेल. मित्रांचा आधार मिळेल. अधिकारी वर्गाच्या हातात अडकलेले कामे पूर्ण होतील.

कन्या – आवडीचे काम झाल्याने परिस्थिती आनंददायी राहील. व्यापार-व्यवसायात वेळ अनुकूल आहे. चाकरमान्यांना लाभ मिळेल.

तूळ – आजचा दिवस चांगला असेल. तरीही आर्थिक मुद्द्यांच्या प्रश्नांबद्दल वाद होणे शक्य आहे. आपणास कुटुंबीय व इतर लोकांबरोबर चांगला काळ व्यतीत होईल.

वृश्चिक – आजचा दिवस आपल्या माहितीत परिवर्तन आणू शकतो. अकस्मात आलेल्या परिवर्तनांमुळे आपल्या जीवनाला नवीन दिशा मिळेल. प्रवास व बौद्धिक कामे संभवतात.

धनु – आजच्या दिवशी किंचित विश्रांती घ्या आणि मनन-चिंतन करा. काही वेळ समस्या निवारणासाठी आणि आत्मविश्वासाच्या वाढीसाठी काढा.

मकर – सामूहीक उपक्रम आणि प्रवास आपल्यासाठी श्रेयस्कर ठरतील. इतरांनी आपल्या विचारांपासून प्रभावित व्हावे यासाठी त्यांच्या समोरील आपले सादरीकरण प्रभावशाली करा.

कुंभ – आजचा दिवस कार्यांसाठी चांगला आहे जबाबदारी वाढेल पण काही देवाण-घेवाण करतांना घाई करू नका. अनिर्णित राहीलेली प्रकरणे नवे प्रश्न उभे करतील.

मीन – आपल्या मनातील भावना प्रकट करण्याचा दिवस. काही विशेष करण्याचा प्रयत्न करा. कौटुंबीक जीवन चांगले राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *