News & View

ताज्या घडामोडी

images 2020 07 11T085039.947

आजचे राशीभविष्य!


 सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग 
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. शरद
🚩 दक्षिणायन 🌕 अश्विन कृष्ण तृतिया
🌸 नक्षत्र…. भरणी
🌸 वार… गुरुवार
🌼 दिनांक….. ०९ आँक्टोंबर २०२५
🌚 राहुकाल… दुपारी ०१/३० ते ०३/००
🌞 आजचा दिवस चांगला
🌞 सुर्योदय ०६/२२ मि.
🌘 सुर्यास्त ०६/०७ मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩

🚩 शुभभवंतु 🚩

‼️दैनिक राशी भविष्य ‼️
दिनांक ०९ आँक्टोंबर २०२५

मेष:-चंद्राचा गुरू आणि शुक्राशी शुभ योग आहे. तर सूर्याशी अशुभ योग आहे. मन आनंदी करणाऱ्या घटना घडतील. प्रेमात यश मिळेल. गुरुची नाराजी कमी होईल. प्रवास सुखकर होतील.

वृषभ:- धनलाभाचा दिवस आहे. कार्यसिद्धी होईल. तुमचा हुद्दा वाढू शकतो. आज दर्जात्मक कामे होतील. शत्रूचा पराभव होईल. आज कर्जे फेडणायसाठी चंगला दिवस आहे.

मिथुन:- अनुकूल ग्रहमान आहे. तृतीय शुक्र मान सन्मान मिळवून देईन. मित्रांकडून लाभ होतील. आप्त आणि नातेवाईक यांच्या भेटी होतील. आज तुम्हाला नवीन आशा दिसू लागतील. परदेशगमन घडेल.

कर्क:-द्वितीय शुक्र तुम्हाला भरभराट देईन. आज तुम्हाला देणगी किंवा बक्षीस रूपाने भेट मिळेल. काही अडकलेली कामे आज पुढे सरकतील. दूरच्या देशात प्रवास घडू शकतो. गुप्त कारवायांचा सामना करावा लागेल.

सिंह:- अत्यंत अनुकूल ग्रहमान आहे. आज तुमच्या वागण्यात दिखाऊपणा वाढू शकतो. उंची वस्त्रे खरेदी होईल. द्रव्यालाभ घरदारआहे. सुगंधी द्रव्ये खरेदी होऊ शकते. तुमची समाजाभिमुखता वाढेल. महत्वाकांक्षा वाढतील.

कन्या:- अष्टम स्थानी चंद्र आहे. एकट्या शुक्राच्या बळावर वाटचाल करावी लागणार आहे. सत्कृत्य करण्याकडे कल असेल. चैनीच्या वस्तूंची खरेदी होईल. आज केलेले श्रम वाया जाऊ शकतात.

तुळ:-अनुकूल ग्रहमान आहे. सातवा चंद्र आणि लाभकारक शुक्र यांच्या संयोगाने आज तुम्हाला श्रेष्ठत्व प्राप्त होईल. नवीन खरेदी होईल. महागड्या वस्तूंची खरेदी होईल. गृहसौख्य लाभेल. तुमची कर्तव्य तुम्ही उत्तमप्रकारे पार पडाल.

वृश्चिक:-आज चांगल्या आणि सज्जन मित्रांचा सहवास लाभणार आहे. आरोग्यप्राप्ती होईल. मन उत्साही राहील आर्थिक लाभ होतील. अष्टम गुरुची तीव्रता आज जर कमी होईल. तरीही प्रवासात काळजी घ्या.

धनु:- पंचम चंद्र आहे. आज फारशी अनुकूलता नाही. मात्र आज एखादे मंगलकार्य ठरू शकते. कोर्टात यश मिळेल विशेषतः दिवाणी खटल्यात यश मिळेल. राजसन्मान मिळेल. इच्छुकांना अपत्यप्राप्ती होईल.

मकर:- चंद्राची अनुकूलता नाही. खर्चात वाढ संभवते. कौटुंबिक त्रास होऊ शकतात. मन अस्वस्थ राहील. नातलगांकडून निराशा होईल. अष्टम शुक्र काही सुखाचे क्षण अनुभवास देईन. अर्थप्राप्ती होईल.

कुंभ:- अष्टम रवीची नाराजी आज प्रामुख्याने जाणवणार आहे. मात्र गुरुची भक्कम साथ लाभणार आहे. विद्या – व्यासंग यात रमून जाल. उत्पन्न वाढेल. आभ्या लाभ होतील. मात्र महिलांसाठी खर्च होईल. गैरसमज टाळा. चिडचिड वाढेल.

मीन:- मानहानी होण्याची शक्यता आहे. कामात विघ्न येऊ शकते. वस्तूंचा नाश होऊ शकतो. प्रवासात त्रास होऊ शकतो. मात्र शुक्राच्या अनुकूलतेमुळे काही सुखे अनुभवास येतील. मोठ्यांकडून गौरव प्राप्त होईल. इष्टमित्र भेटतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *