News & View

ताज्या घडामोडी

images 2020 07 11T085039.947

आजचे राशीभविष्य!


 सुप्रभात 🌞
🌝 आज चे पंचांग 
🚩विक्रम संवत्सर २०७९
🚩शालिवाहन संवत् १९४७
🌞 संवत्सर : विश्ववसु
🌕 ॠतु…. शरद
🚩 दक्षिणायन 🌕 अश्विन शुक्ल / कोजागिरी पौर्णिमा /पौर्णिमा समाप्ती सकाळी ०९/१८ मि.
🌸 नक्षत्र…. रेवती
🌸 वार… मंगळवार
🌼 दिनांक….. ०७ आँक्टोंबर २०२५
🌚 राहुकाल… दुपारी ०३/०० ते ०४/३०
🌞 आजचा दिवस शुभ
🌞 सुर्योदय ०६/१७ मि.
🌘 सुर्यास्त ०६/२० मि.
🚩आजचा दिवस शुभ व आनंदाने जावो 🚩

🚩 शुभभवंतु 🚩

‼️ दैनिक राशिभविष्य मंथन‼️दिनांक ०७ आँक्टोंबर २०२५

मेष:- आज चन्द्र तुमच्या व्ययस्थानीआहे. मन अध्यात्मा कडे झुकेल. रुटीन चालू ठेवा.अचानक लाभाची शक्यता.कर्ज मिळेल.

वृषभ:- आज दिवशी आर्थिक लाभ होतील.एखाद्या समारंभात सहभाग घ्याल. मन आनंदी राहील. अचानक धनलाभाची शक्यता.

मिथुन:- आज उत्तम दिवस आहे. काही मोठा बदल कामात घडेल. नोकरीत बदल करू इच्छुकांना नवीन संधी येतील.खर्च वाढतील पण योग्य कारणास्तव होतील.महत्त्वाची कामे सकाळीच करा.

कर्क:- आज भाग्यात चन्द्र आहे. अनपेक्षित यश मिळेल.उच्च शिक्षणात यश.तीर्थक्षेत्री यात्रा घडतील.

सिंह:- आज कला/ कौशल्याला वाव मिळेल. मन उत्साहित राहील.नवीन ओळखीतून लाभ होतील.

कन्या:- आज छान दिवस. प्रवास घडेल.हितशत्रूं चा पराभव होईल.भाग्य उजळेल. पती सोबत मनोरंजनात्मक कार्यक्रमात भाग घ्याल.पतीशी जुळवून घेतल्यास दिवस आनंदी पार पडेल.

तुळ:-आज छान दिवस आहे. मनोबल वाढेल. आर्थिक लाभ होतील.यशस्वी व्हाल.

वृश्चिक:- आज मस्त दिवस आहे. खरेदी कराल.दूर गेलेल्या व्यक्ती परत येतील.दुरावा मिटेल.लॉटरी किंवा तत्सम मधून लाभ होतील.

धनु:-आज अत्यंत सुंदर दिवस आहे. आरोग्य सुदृढ राहील. शत्रू नामोहरम होतील.नोकरीत उन्नती होईल.कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.घर आवरताना खुप दिवस शोधत असलेली वस्तू सापडेल.

मकर:- आज धन संपत्ती वाढेल. अंदाज बरोब्बर ठरतील.नवीन ओळखी होतील.विवाह इच्छुकांना खूष खबर मिळेल.मोजके बोला.

कुंभ:- आजच्या दिवशी धन स्थानी चन्द्र आहे,आवडत्या व्यक्तीशी भेट घडेल.इतरांवर प्रभाव राहील.गायन वादनाचा आनंद घ्याल.मनोरंजक कार्यक्रमाचा आनंद लुटाल.बोलण्यातून लाभ होईल. उत्पन्नांत भर पडेल.

मीन:- आजचा सुंदर दिवस आहे. तुमच्याच राशीत चंद्र आहे.अनपेक्षित धनलाभाची शक्यता. पाण्याजवळ भाग्योदय होईल.मन अध्यात्माकडे झुकेल.
कामकाज करताना सावधानता बाळगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *