News & View

ताज्या घडामोडी

unnamed

कंकालेश्वर मंदिरासाठी नऊ कोटींचा निधी!

बीड - कंकालेश्वर मंदिर, ता.जि.बीड या राज्य संरक्षित स्मारकाच्या जतन, दुरुस्ती कामासाठी येणाऱ्या ९,१४,५४,४०३/- (रु.नऊ कोटी चौदा लक्ष चौपण्ण हजार चारशे तीन मात्र) इतक्या रकमेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.

या संदर्भातील शासन निर्णय सांस्कृतिक व पर्यटन पर्यटन विभागाने आज जारी केला आहे.संचालक, पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय यांना यासाठी नियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. कंकालेश्वर मंदिर हे बीड शहरातील एक प्राचीन आणि भव्य शिवमंदिर आहे.वास्तुशैलीवरून ते १० व्या ते १२व्या शतकादरम्यान (सुमारे १००० वर्षे जुने) बांधले गेले असावे असे मानले जाते.ते बीडच्या ऐतिहासिक वारशाचे एक प्रमुख प्रतीक मानले जाते आणि पर्यटकांसह भक्तांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. मंदिराची वास्तुकला, स्थान आणि धार्मिक महत्त्व यामुळे ते विशेष ओळखले जाते.

दादा ट्रस्टिंच्या भरवशावर राहू नका!

अजितदादा तुम्ही बीड शहराचे वैभव असणाऱ्या कंकालेश्वर मंदिराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी मंजूर केला त्याबद्दल तुमचे आभार पण या मंदिराच्या ट्रस्टींच्या भरवशावर तुम्ही विकास होईल अशी अपेक्षा ठेवणारा असाल तर थोडा विचार करा. आज पर्यंत या मंदिराच्या विकासासाठी जो काही निधी आला किंवा मंदिराची जी काही जमीन होती ती ट्रस्टींनी कुणाला विकली याची चौकशी करून मगच या निधीचा विनियोग करण्याचे अधिकार संबंधितांना द्या. या मंदिराच्या विकासासाठी आलेला निधी जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली खर्च झाला तरच तो सत्कारणी लागेल अन्यथा देवाच्या दारातील रुपया देखील न सोडणारे लोक या ठिकाणी बसले आहेत.

मंदिराच्या बाह्यभागावरील शिल्पकला ही मराठवाड्यातील प्राचीन वास्तुकलेचे उत्तम उदाहरण आहे. महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यात या मंदिरात हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. मंदिराचे हे महत्त्व लक्षात घेऊन त्याचे जतन आणि संवर्धन करण्याची मागणी अनेक दिवसांपासून लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संघटनांकडून होत होती. त्याची दखल घेऊन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या पुढाकाराने हा विषय अखेर मार्गी लागला असून आज त्या संदर्भातील शासन निर्णय जारी झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *