बीड – बीड शहरापासून जवळच असलेल्या पेंडगावजवळ भीषण कार अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला. चालकाचे नियत्रंण सुटून कार तीन ते चार वेळेस पलटी झाली अपघाताची ही घटना आज 23 जून रोजी पहाटे 2 वाजेच्या सुमारास धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील घोसापुरी शिवारात घडली अपघातातील मयत आणि जखमी नेवासा (जि.अहमदनगर) येथील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
धीरज गुणदेजा (वय 30), रोहन वाल्हेकर (वय 32), विवेक कांगुने (वय 33) अशी मृतांची नावे आहेत. तर आनंद वाघ (वय 28) हा गंभीर जखमी असून त्याच्यावर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हे सर्व नेवासा येथील रहिवासी आहेत.
जखमीवर बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.कारवरील नियंत्रण सुटल्याने रोडवर तीन -चार पलट्या घेऊन रोडच्या बाजूला कार पलटी झाली.अपघाताची माहिती समजताच महामार्ग वाहतूक उपनिरीक्षक घोडके, रवींद्र नागरगोजे, बीड ग्रामीण ठाण्याचे जायभाये, रवी सानप तसेच महामार्ग पेट्रोलिंग टीमचे प्रमुख प्रतीक कदम , सुनील कवडे, राम गायकवाड तसेच महामार्ग रुग्णवाहिका डॉ. विशाल डोंगर , यशवंत शिंदे, चालक सुभाष नन्नवरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत केली.
Leave a Reply